महिलेने असे बनविले झटपट आईस्क्रीम की Anand Mahindra देखील झाले फॅन

| Updated on: Apr 02, 2023 | 12:27 PM

प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्र यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे. यात एक गृहीणी अशा कल्पकतेने घरच्या घरी झटपट आईस्क्रीम तयार करताना पाहून सर्वच जण दाद देत आहेत.

महिलेने असे बनविले झटपट आईस्क्रीम की Anand Mahindra देखील झाले फॅन
anand mahindra- icecream
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याची सुरूवात होताच आपल्याला आपले आवडते आईस्क्रीम खाण्याची इच्छा होतेच. आता तर वेगवेगळ्या चवीचे आणि फ्लेवरचे आईस्क्रीम बाजारात मिळत आहेत. हे वेगवेगळे फ्लेवर लहान मुलांपासून मोठ्यांनाही आकर्षित करीत आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच सोशल मिडीयावर एका गृहीणीने घरच्याघरी झटपट आईस्क्रीम कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. त्यास प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र यांनी देखील शेअर केले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र सोशल मिडीयावर सक्रीय असून सतत वेगवेगळ्या विषयावर आपली मते मांडत असतात. चांगल्या गोष्टींना ते आपल्या ट्वीटर हॅण्डल वरून शेअर करीत प्रोत्साहन देत असतात. अशात त्यांनी एका गृहीणीने घरच्या घरी झटपट तयार केलेल्या आईस्क्रीमचा व्हिडीओ पाहून त्याला दाद दिली आहे. आणि या व्हिडीओला त्यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून शेअर केले आहे.

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एका गृहीणीने घरच्याघरी बनविलेल्या आईस्क्रीमचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप पसंद केले जात आहे. ज्यात एक महिला आपल्या घरातील सिलींग पंख्याचा वापर करून आईस्क्रीम बनविताना दिसत आहे. व्हिडीओत एक महिला आधी दुधात आईस्क्रीमचा मसाला टाकून स्टोव्हवर ते दूध पातेल्यात तापविताना दिसत आहे. त्यानंतर त्या दूधाला थंड करून एका किटलीमध्ये भरताना दिसत आहे. त्यानंतर तिने एका मोठ्या डब्यात ही दूधाची किटली ठेवताना दिसत आहे. नंतर या डब्यात ती बर्फाचे तुकडे भरताना दिसत आहे. आणि शेवटी ही किटली फिरविण्यासाठी तिने सिलींग पंख्याला बांधलेल्या दोरीचा ती कसा कल्पक वापर करतेय ते दिसत आहे.

 

हा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्र यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवर शेअर करीत तिला कॅप्शनही दिली आहे. त्यात त्यांनी ‘इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होतो, पंख्याच्या मदतीने आईस्क्रीम केवळ भारतातच बनविताना तुम्हाला पाहायला मिळू शकते.’ 2 मिनिट 31 सेंगदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 32 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 68 हजार 800 लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे.