मुंबई : अनेकदा संकटात कोणी मदत करताना दिसत नाही. लोकं एखाद्या गोष्टीचे फोटो काढतात, पण कोणी मदत करत नाही अशी सध्या जागृत नागरिक ओरड करीत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या अशी लोकं कमी पाहायला मिळतात. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Viral Media) झाला आहे. तो व्हिडीओ पावसामधील (Rain) आहे. एक महिला आपल्या मुलाला कंबरेवरती घेऊन निघाली आहे. त्याचवेळेस समोरुन आलेल्या व्यक्ती त्या महिलेला मदत करते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी चांगल्या कमेंट (Video Comment) देखील केल्या आहेत. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा आनंद होईल.
चांगला व्हिडीओ असल्यामुळे तो इंस्टाग्रामवरती शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओ दिसत आहे की, पाऊस सुरु आहे. त्यावेळी काही गाड्या आजूबाजूने जात आहेत. काही लोकं तिथून जात आहेत. काहीजणांच्या अंगावर छत्री आहे, तर काही लोकांच्या अंगावर छत्री नाही. त्याचवेळी तिथून एक बाई आपल्या मुलाला कंबरेवरती घेऊन निघाली आहे. तिला पाहून एका व्यक्तीने त्याच्या हातातली छत्री दिली आहे. ज्यावेळी ती छत्री बाई हातात घेते त्यावेळी त्या व्यक्तीचे पाया धरण्याचा प्रयत्न करते. तसेच आभार मानते, अशी माणसं सध्या पाहायला मिळत नाहीत.
ज्या एक व्यक्ती आपल्याला छत्री देतोय, त्याच्याकडे दुसरी छत्री नाही. हे सगळं पाहून ती महिला भावूक झाली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “चला दयाळूपणे जग बदलू: पावसात भिजत असताना एक माणूस आपल्या मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला आपली छत्री देतो.”
हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी लाईक केला आहे. सोशल मीडियावर असणाऱ्या नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या दयाळूपणाचे कौतुक केले आणि कमेंटमध्ये त्याच्यासाठी चांगला मजकूर लिहीला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “मी नेहमी म्हणेन – या छोट्या छोट्या गोष्टी जगाची तडे भरून काढतात.” आणखी एका नेटकऱ्याने ‘काय राजा’ अशी कमेंट केली.