नवी दिल्ली : आपण आता कोणतेही आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी मित्रांना पार्टी देत असतो. परंतू मनोरंजनाचे कोणतेही साधन नसताना पाच हजार वर्षांपूर्वीही लोक पार्टी करायला पबमध्ये जायचे आणि बियर प्यायचे याचे पुरावे पुरातत्वतज्ज्ञांना सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज आपल्याजवळ हवी ती मनोरंजनाची साधने आहेत, परंतू पाच हजार वर्षांपूर्वी लोकांचे जीवन कसे होते याचे पुरावे इराकमधील खोदकामात सापडले आहेत.
संशोधनात काय पुढे आले आहे …
रिपोर्ट नूसार दक्षिण इराक येथील खोदकामात पाच हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृतीचा उलगडा होणार आहे. इ.स. पूर्व 2700 मध्ये सर्वसामान्याचे जीवन कसे होते, याचा अंदाज हळूहळू खोदकामात मिळणाऱ्या वस्तूंमुळे संशोधकांना येत आहे. या खोदकामात मातीच्या चुली, एवढच काय मातीचा फ्रिज, रेस्टोरेंट आणि पब सापडला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यात काही कोनीकल शेपच्या काही वाट्या सापडल्या आहेत. या वाट्यांमध्ये मासे आणि काही प्राण्यांच्या मांसाचे हाडे सापडली आहेत.
पेन्सील्वेनिया युनिवर्सिटी आणि पिसा युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त पथकाने आदीम मनुष्यजातीचे अवशेष आणि एक मोठा ओव्हन, जेवणाऱ्यांसाठी मोठ्या आकारांचे बेंच आणि टेबल्स आणि सुमारे 150 सर्व्हीग बाऊल सापडली आहेत. अहवालानूसार येथे खोदकात बियरचे पुरावेही सापडले आहेत. संशोधकांनी असा दावा केला आहे की आपले पूर्वज बियर प्यायचे. प्रोजेक्ट डायरेक्टर होली पीटमॅन यांनी म्हटले आहे की त्यांना त्याकाळातील मातीचा फ्रीज ही सापडला आहे. शेकडो विविध आकारची भांडी, जेवणाचे टेबल आणि बेंच सापडले. येथे लोक विरूंगळ्यासाठी एकत्र जमून आराम करायचे असेही त्यांनी सांगितले.
हा एक इंडस्ट्रीय हबचा परिसर होता
लागाश नावाच्या एक हजार एकरवर पसरलेल्या या पुरातत्व जागेची पाहणी करण्यात आली आहे, येथे एक इंडस्ट्रीय हबचा परिसर होता. दक्षिण मेसोपोटामियाच्या सगळ्यात मोठ्या हा शहरांपैकी लागाश हा परिसर होता. हा प्रदेश आर्थिक, राजकीय आणि धार्मिक केंद्र देखील होता. येथील लोक दूध देणारी गुरे पाळायचे, मासे पकडायचे आणि शेती देखील करायचे. आमची टीम या लोकांच्या व्यवसायाबद्दल आणखी माहीती काढत आहेत. ई.स पूर्व 2700 मध्ये मधुशालाचा ( पब ) वापर करणारी ही मानवी संस्कृती आश्चर्यजनक असल्याचे पीटमन यांनी म्हटले आहे.