मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज नवे व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो, किंवा आनंद होतो. सध्या एका चोरट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चोरट्याने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांना धक्काही बसला आहे आणि घामही फुटला आहे, तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर (trending news) तुमची देखील प्रतिक्रिया आम्हाला सांगा. आता चोरट्याला व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल एवढं मात्र नक्की.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर पटकन व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसत असलेला चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने चौथ्या मजल्यावर चढला आहे. ज्यावेळी चोरटा भरदिवसा बिल्डींगच्यावरती चढत आहे, त्यावेळी इतर लोकांनी त्या चोरट्याला पाहिलं आहे. त्या चोरट्याने पाईपचा आधार घेऊन चौथ्या मजला गाठला होता. हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही प्रतिक्रिया वाईट आहेत, काही लोकांनी त्या चोरट्याचं कौतुकं केलं आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @gharkekalesh या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत असलेला चोर चौथ्या मजल्यावर चढत आहे. ज्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. ते त्या चोराला आवाज देत आहेत. त्यानंतर चोरटा पटकन खाली उतरताना दिसत आहे. हे सगळं पाहून नेटकरी एकदम घाबरले आहेत.
Verbal kalesh over thief climbing and Descending 4floor under 50seconds in West Delhi pic.twitter.com/0nLbDhRJwM
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 7, 2023
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष खेचत आहे. हा व्हिडीओ 93 हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘तिथून एक मोठा दगड फेकून मारा.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘आता सामान्य माणसाने काय करावे? येथे दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडतील. तिसर्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘आवाज करून चोराची सगळी मेहनत वाया गेली.’