VIDEO | व्हिडीओत तुम्हाला हत्ती दिसेल, परंतु ते नेमकं काय आहे हे समजण्यासाठी व्हिडीओ पाहा

| Updated on: Aug 25, 2023 | 10:20 AM

VIRAL VIDEO | व्हायरल व्हिडीओत तुम्हाला हत्ती दिसत असेल, परंतु ते नेमकं काय आहे हे समजण्यासाठी व्हिडीओ पाहा. त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा

VIDEO | व्हिडीओत तुम्हाला हत्ती दिसेल, परंतु ते नेमकं काय आहे हे समजण्यासाठी व्हिडीओ पाहा
viral news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अनेकदा आपण एखादी गोष्ट एकसारखी पाहत असतो. त्यामध्ये काहीतरी नवीन जाणवू लागल्याने आपण एकसारखे पाहतो. किंवा एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ती आपण एकसारखी पाहत असतो. निसर्ग (nature) पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण जवळचा निसर्ग पाहतात, तर काही परदेशातील निसर्ग (viral video) पाहण्याला पसंती देतात. निसर्गात अनेक गोष्टी लपलेल्या असतात.त्यामध्ये लपलेल्या गोष्टी क्लचित जणांना सुचतात असं पाहायला मिळालं आहे. त्याचपद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending news) चांगलाचं व्हायरल झाला आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा कंफ्यूज होणार आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ अनेक लोकांचा चांगलाचं गोंधळ झाला आहे. व्हिडीओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा गोंधळात पडाल. व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा असं वाटेल की, त्या विशाल समुद्रात एक हत्ती उभा आहे. परंतु त्या खरं कारण वेगळं आहे.

हे सुद्धा वाचा

माइक्रोब्लॉगिंग साइटवरती Enezator नावाच्या खात्यावर एक व्हिडीओ शेअर झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक सुंदर पर्यटनस्थळ दिसत आहे. त्याच्याखाली एक निळं निळं समुद्राचं पाणी दिसत आहे. तो डोंगर पाहून तुमचा गोंधळ होईल. त्या व्हिडीओ हत्ती समुद्राच्या पाण्यात उभा आहे असं चित्र दिसत आहे. त्या डोंगराचा आकार एकदम समुद्रासारखा आहे. सोंड आणि कान हे एकदम हत्तीसारखे दिसत आहेत.

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा एलिफेंट रॉकचा आहे. जो वेस्टमन बेटांमधील हेमी बेटावरील नैसर्गिक खडक आहे. हे अल्डफेलच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ 76 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओ कॅप्शन देण्यात आलं आहे. हा खडक कशासारखा दिसतो, त्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्या लोकांनी त्याला अस्वल आणि म्हैस सुध्दा म्हटलं आहे.