VIDEO | जंगलाचा हा राजा पाण्यातही शिकार करतोय, पाण्यात पोहणारा बिबट्या पाहून…

| Updated on: Feb 14, 2023 | 2:01 PM

ट्विटरवरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या पाण्यात पोहत असताना दिसत आहे. त्याचबरोबर बिबट्या पायाच्या मदतीने पोहत आहे. त्याचबरोबर पाण्यात ज्या गोष्टी त्याला खाण्यायोग्य आहेत...

VIDEO | जंगलाचा हा राजा पाण्यातही शिकार करतोय, पाण्यात पोहणारा बिबट्या पाहून...
Leopard Video Viral
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : बिबट्या (Leopard) झटपट शिकारीसाठी अधिक ओळखला जातो. त्याचबरोबर एखाद्यावर झडप घालून तात्काळ त्याला घायाळ करण्यात बिबट्या अधिक यशस्वी होतो. आतापर्यत महाराष्ट्रातील बिबट्याचे (Maharashtra Leopard) अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहीवेळेला बिबट्याने हल्ला केला आहे. तर काहीवेळेला बिबट्या शिकारीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळालं आहे. बिबट्याची चपळाई प्रत्येकवेळी व्हिडीओत पाहायला मिळाली आहे. जंगलात शिकार करणारा बिबट्या पाण्यात सुध्दा शिकार करु शकतो. एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बिबट्या पाण्यात शिकार शोधत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बिबट्याची अवस्था तुम्ही पाहू शकता.

व्हिडीओमध्ये एक बिबट्या पाण्यात पोहत आहे

ट्विटरवरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या पाण्यात पोहत असताना दिसत आहे. त्याचबरोबर बिबट्या पायाच्या मदतीने पोहत आहे. त्याचबरोबर पाण्यात ज्या गोष्टी त्याला खाण्यायोग्य आहेत, त्या तो खात सुद्धा आहे. पाण्यात असलेले माशांची शिकार करीत आहे. या व्हिडीओला पाहून अनेक लोकांना घाम फुटला असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मांजर अशी शिकार करु शकते असं मला वाटतं नाही. त्यावर अजून कमेंट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

6.5 मिलियन लोकांनी तो व्हिडीओ पाहिला…

हा व्हिडीओ लोकांनी अनेकवेळा पाहिला आहे. त्याचबरोबर आतापर्यत हा व्हिडीओ 6.5 मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ लोकांनी पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला आहे. एक नेटकऱ्याने पाण्यात घाबरायचं काही कारण नाही असं म्हटलं आहे. एका युझरने तर बिबट्या कुठेही काहीही करु शकतो असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सुध्दा बिबट्याचं प्रमाण अधिक आहे. रोज नव्या घटना उजेडात येत आहेत. राज्यात काही ठराविक जिल्ह्यात बिबट्याचं रोज लोकांना दर्शन घडत आहे. आतापर्यंत बिबट्या सीसीटिव्हीमध्ये दिसल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात बिबटे अधिक आहेत.  कारण तिथल्या घटना वारंवार उजेडात येत आहेत.