मुंबई, संयम, हा एक असा गुण आहे जो कठीण काळात शक्ती वाढवतो, माणसाला बलवान बनवतो. कठीण परिस्थितीतही माणसाने सहनशील राहून संयम राखला पाहिजे, अशी शिकवण अनेक महापूरूष देऊन गेले आहेत. संयम असेल तरच तो जीवन साधे बनवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये संयम नसेल तर तो कधीही कठीण प्रसंगांना योग्यरित्या सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळे वेळ कोणतीही असो, लोकांनी संयम आणि धैर्य राखले पाहिजे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा एक व्हिडीओ (Perfect Future Husband) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कमालीचा संयम दाखवताना दिसत आहे. त्याचा संयम बघून लोकं म्हणत आहेत की या मुलामध्ये परफेक्ट नवरा बनण्याचे सर्व गुण आहेत.
तुम्ही पाहिलं असेल की लोक गंमतीने म्हणतात की लग्नानंतर पुरूषांमध्ये सहनशीलता वाढते. बायका त्यांना टोमणे मारतात, पण ते शांतपणे ऐकत राहतात. असेच काहीसे सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एक लहान मुलगी तिच्यासोबत बसलेल्या मुलाला खूप त्रास देते.
त्याचे गालगुच्चे घेते, चुंबन देखील घेते एकंदरीत काय तर मुलाला त्रास देत आहे. परंतु मुलाने आपला संयम गमावला नाही. एक-दोनदा तो मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ती त्याला त्रास देऊ नये, परंतु मुलगी तिचे कृत्य चालू ठेवते. अशा स्थितीत मूलही तिच्याकडे फारसे लक्ष न देता मॅडमचे लेक्चर ऐकण्यात मग्न असतात. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की मुलगी त्याला कसे त्रास देण्याचा प्रयत्न करते, परंतु तो अजिबात चिडत नाही आणि संयम राखतो.
हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर moskva_kairumdyylyk नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 14 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.
सोबतच लोकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणतात की मूल एक दिवस नक्कीच यशस्वी नवरा बनेल, कारण त्याच्यात संयम भरलेला आहे, तर काही म्हणत आहेत की मुलाचा संयम ईश्वराने दिलेला आहे. त्याचप्रमाणे काही युजर्स मुला-मुलीला भावी पती-पत्नी म्हणून संबोधत आहेत.