नवी दिल्ली : खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं, असं अनेकदा म्हटलं जातं. त्याचबरोबर खरं प्रेम अनेकांच्या नशीबात नसतं असं अनेकदा तुम्ही मित्रांच्या तोंडून ऐकलं असेल. काही लोकांना अनेकदा चांगले प्रयत्न करुनही त्यांचं खरं प्रेम (true love story) मिळत नाही. एका तरुणाने सुध्दा अशा पद्धतीने एक प्रयत्न केला आहे. त्याने खऱ्या प्रेमासाठी ५० राज्यातील (trending news in marathi) तरुणींची भेट घेतली आहे. परंतु त्याला अद्याप खरं प्रेम मिळालं नसल्याचं जाहीर केलं आहे. तो तरुण सध्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. त्या तरुणाने १०० च्या वरती मुलींना डेट केलं आहे. ज्यावेळी हे प्रकरण त्याने सोशल मीडियावर (social media) शेअर केलं. त्यावेळी अनेकांनी या विषयावरती त्याला सल्ला दिला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, तो तरुण सध्या गर्वाने सांगत आहे की, मी आतापर्यंत १०० मुलींना डेट केलं आहे. त्याने अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील २ मुलींना डेट केलं आहे. परंतु तो सध्याला अजून एकटा मानत आहे. त्या तरुणाचं नाव मैथ्यू असं आहे. तो सांगतो की, त्याने ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून डेटिंगला सुरुवात केली होती. ज्यावेळी सगळीकडं लॉकडाऊन सुरु होतं. त्यावेळी त्याला घरी बसून कंठाळा आला होता. त्यामुळे घरी डेटिंग अॅप सुरु केलं होतं. ज्यावेळी तो ऑनलाईन सगळी माहिती घेऊ लागला. त्यावेळी त्याला काही गोष्टी समजल्या. त्याने अमेरिकेतील ५० राज्यात मुलींना डेट केलं आहे.
मैथ्यू म्हणतो की, राज्यातील अनेक मुलींना मी डेट केलं, परंतु मला अद्याप जशी मुलगी हवी आहे. तशी मिळालेली नाही. पार्टनर शोधण्याचं काम मिशिगन या राज्यातून झालं होतं, ते अलास्का या राज्यात संपलं. त्याने डेटिंग अॅप वापरत असताना आलेला अनुभव सुद्धा शेअर केला आहे. काहीवेळा त्याने मुलींना समोर बसून बोलणं केलं आहे.
काहीवेळेला त्याने मुलींना खूष करण्यासाठी आणि रोमांटिक सीन होण्यासाठी, हेलिकॉप्टर प्रवास, घोडेसवारी असे विविध प्रकार केले आहेत. मैथ्यू म्हणतोय की, त्याला काही मुलींपासून अपेक्षा आहेत. त्याने काही मुलींसोबत चांगलं रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या मुली माझ्यापासून खूप लांब एका वेगळ्या शहरात राहत आहेत. एकमेकांना समजून घेणं गरजेचं असल्याचं सु्ध्दा त्याने जाहीर केलं आहे.