International No Diet Day : आपण भारतीय लोक अतिथि देवो भव या आपल्या संस्कृतीमुळे जगात सगळीकडे ओळखलो जातो. कारण आपण आपल्या घरात काही असो वा नसो पण पाहूणा आला रे आला त्याच्या स्वागतात काहीच कमी ठेवत नाही. तर खाण्यापीण्याकडे तर जरा अधिकच लक्ष देतो. हे झाले पाहूण्याच्याबाबतीत. मात्र जेंव्हा पाहूणा येत नाही, त्यावेळी ही आपण अनेक पदार्थांवर हात साफ करतच असतो. मग ते घरचे असो की मग मागवलेले. त्यात तर फास्ट फुड (Fast Food) असेल तर काही बोलायला नकोच. एका वडापावाच्या जागी दोन खाणार. पण आपण वर्षभर हे खातच असतो. पण दरवर्षी 6 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस (International No Diet Day) साजरा करतात. हा दिवस त्या सर्व लोकांना समर्पित आहे. जे आपल्या आहाराबद्दल जागरूक झाले आहेत. हा दिवस सर्वांना निरोगी अन्न खाण्यास आणि त्यांच्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थांचा मुक्तपणे आनंद घेण्यास प्रोत्साहित करतो. या व्यतिरिक्त हा दिवस शरीराची सकारात्मकता वाढविण्यासह तुमच्या शरीराप्रती (Body) तुमचे प्रेम देखील वाढवतो.
हा दिवस शरीराच्या सर्व प्रकारांचे सौंदर्य आणि विविधता देखील ओळखतो. यामुळेच या दिवशी लोक विविध उपक्रम आयोजित करतात आणि आपल्या नातेवाईकांना मेजवानीसाठी आमंत्रित करतात. तसेच विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार करतात आणि खातात आणि त्यांचा आनंद घेतात.
आता इंटरनॅशनल नो डाएट डेच्या इतिहासाबद्दल बोलूया, तर हा दिवस पहिल्यांदा 1992 मध्ये यूकेमध्ये साजरा करण्यात आला. या दिवसाची सुरुवात मेरी इव्हान्स या ब्रिटीश महिलेने केली. आपल्या शरीराने लोकांचे कौतुक करण्यासाठी तिने हा दिवस बनवला. विशेष बाब म्हणजे मेरी इव्हान्स स्वतः एनोरेक्सियासारख्या आजाराने ग्रस्त होती. मेरी इव्हान्सने डायट ब्रेकर्स नावाची संस्था सुरू केली. तिच्या संस्थेकडे आणि एनोरेक्सियासारख्या आजाराच्या कारणाकडे लक्ष वेधण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस आयोजित केला.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट लोकांना डाएटिंगच्या धोक्यांची जाणीव करून देणे, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि लोकांना प्रभावी पद्धतीने आहाराविषयी शिक्षित करणे हा आहे.
जर आपण या दिवसाच्या महत्त्वाबद्दल बोललो, तर आजच्या काळात आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवसाचे महत्त्व खूप लोकप्रिय झाले आहे. अनेकदा लोक आपल्या आरोग्यामध्ये वाढता लठ्ठपणा टाळण्यासाठी व्यायाम, योगासने इत्यादींसह आहाराच्या विविध पद्धती अवलंबतात, ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची तीव्र कमतरता भासते. या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
आज, International No Diet Day चा मुख्य उद्देश हा आपल्या खाण्यापीण्यामुळे बाह्य शरीर रचनेच झालेल्या बदलांकडे बघणे हा आहे. तर याचे प्रतिक हे हलक्या निळ्या रंगाचे रिबन आहे. तथापि, अनेक रेस्टॉरंट ग्राहकांना आनंददायी पदार्थ खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मार्केटिंग युक्ती म्हणून हा दिवस वापरतात. मात्र याचा खरा हेतू लक्षात घेतला जात नाही.