VIDEO | आजींच्या या जोडीने भोजपुरी गाण्यावर केला धमाकेदार 5G डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

| Updated on: Aug 23, 2023 | 2:19 PM

VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन आजी डान्स करीत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर कमेंट करीत आहेत.

VIDEO | आजींच्या या जोडीने भोजपुरी गाण्यावर केला धमाकेदार 5G डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ
viral image
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आयुष्य जगत असताना वयाकडं कोणी पाहत नाही. वय हा आकडा असतो.आयुष्य जगत असताना बिनधास्त आयुष्य जगणारे प्रत्येकवेळी कायतरी नवीन करीत (trending news) असतात. असाच दोन वयोवृध्द महिलांचा एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्या व्हिडीओ दोन महिला भोजपुरी गाण्यावर तुफान डान्स करीत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या डान्सची स्टेप (bhojpuri song dance step) सुध्दा अनेकांना आवडली आहे. हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.काही लोकांनी आज्जींच्या डान्सला ५ जी डान्स असं म्हटलं आहे.

दोन्ही आजींचा डान्स अनेकांना आवडला

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती पुष्पा चौहान नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. दोन वयोवृध्द महिला त्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एका महिलेने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर दुसऱ्या महिलेने सफेद रंगाची साडी नेसली आहे. त्या महिला नाचत असताना त्यांच्या हातात एक परात आणि चमचा असल्याचं दिसत आहे. त्या महिलांचा डान्स हा पारंपारिक पद्धतीचा आहे. विशेष म्हणजे तो डान्स अनेकांना आवडला सुध्दा आहे. दोन्ही आज्जींचा डान्स अनेकांना आवडला देखील आहे.

हे सुद्धा वाचा

नाचण्यासाठी वय लागत नाही

सध्याचा व्हायरल व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 88 हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला मजेशीर कमेंट आल्या आहेत. त्या आजींचा डान्स पाहिल्यानंतर त्या थकल्या आहेत, असं अजिबात वाटतं नाही एकाने कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये आजी तुमचा डान्स अधिक चांगला आहे. तो व्हिडीओ लवकरचं मिलियनमध्ये जाणार आहे. आणखी एकाने लिहीलं आहे. आज्जी काय भारी तुम्ही नाचला आहात. आणखी एकाने लिहीलं आहे की, नाचण्यासाठी वयाची अट लागत नाही.