नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) एखादी गोष्ट पटकन व्हायरल (Viral) होते. सध्या अशीचं एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीला 60 मुलं झाली आहेत. त्याला सध्या तीन पत्नी आहेत. त्यांना 60 मुलं झाली आहेत. विशेष म्हणजे 100 मुलं असावीत असं त्या व्यक्तीचं (Pakistan story) टार्गेट आहे. त्यामुळे तो चौथ्या पत्नीच्या शोधात आहे.
त्या व्यक्तीचं नाव सरदार हाजी जान मोहम्मद असं आहे. रविवारी त्या व्यक्तीला 60 वं मुलं झाली आहेत. तो क्वेटा शहर बलुचिस्तान प्रांतातील आहे. त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या पाच मुलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.
सध्या त्यांच्याकडे 55 मुलं आहेत. त्या व्यक्तीने असं सांगितलं की, अल्लाची मर्जी असेल तर अजून मुल जन्माला घालू शकतो. विशेष म्हणजे त्यांच्या तीन पत्नी आणि सगळी मुलं एकाचं घराच राहतात. जान मोहम्मद हे पेशाने कंपाऊडर आहेत. त्याचबरोबर ते क्लिनिक सुध्दा चालवतात.
जान मोहम्मद यांच्या घरी अधिक मुलींची संख्या असावी असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. जान मोहम्मद यांच्या मुलांचं वय आता अठरा वर्षाच्या पुढे गेलं आहे. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की, एवढ्या मुलांची नाव कशात राहतात का ? तेव्हा सुध्दा त्यांनी होणार दिला आणि 100 मुलं व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
जान मोहम्मद यांना एवढ्या मोठ्या परिवाराचा खर्च पेलताना अधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमधील स्थिती सध्या योग्य नसताना सुध्दा त्यांनी हा निर्णय घेतला आहे.