मुंबई : एक छोट्याशा चुकीमुळे सुध्दा मोठा अपघात (Accident) होऊ शकतो. अशीचं एक घटना पुण्यात (pune bus accident) पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हि़डीओमध्ये एक व्यक्ती पान शॉपच्या बाहेर उभी आहे. त्याचवेळी अचानक एक बस बाजून स्पीडने जात आहे. बसचं स्पीड इतकं आहे की, शेजारी असलेल्या मुलगा सु्द्धा घाबरला आहे. पानटपरीच्या शेजारी असणाऱ्या मुलाचा सुध्दा जीव वाचला आहे. 45 सेंकदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील (pune bus accident viral video) असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.
व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती पान दुकानाच्या शेजारी बाईकवरती बसली आहे. त्याचवेळी त्या बाईकच्या शेजारुन एक बस वेगाने निघाली आहे. त्या बाईकवरती बसलेल्या तरुणाला सुध्दा माहित नाही की, बस त्याच्या इतक्या जवळून गेली आहे. एका छोट्याशा चुकीमुळे सुध्दा लोकांचा जीव जाऊ शकतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. 45 सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. या पोस्टला अनेक लोकांनी आपल्या कमेंट केल्या आहेत.
Next time think twice before parking your vehicle next to a pan bidi shop on the road.
Luck will not work always.
Check the video from 45 secs onwards.
? Pune pic.twitter.com/VEAi2yn4yY
— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) May 22, 2023
व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने सांगितले आहे की, एका छोट्याशा चुकीमुळे एका व्यक्तीचा जीव गेला असता. आणखी एका युजरने लिहीलं आहे की, बसचा ड्राईव्हर इतका बेजबाबदार कसा असू शकतो. त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीने लिहीलं आहे की, यांच्यावर कारवाई कधी होणार ? हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ त्यावर वाईट कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर बाईकवरती उभ्या असलेल्या व्यक्तीला सुध्दा सल्ला दिला आहे.