सेल मध्ये खरेदी करण्यासाठी संपूर्ण जगभरातील ग्राहक आघाडीवर असतात. मात्र, केरळ मधील नागरीकांना सगळ्यांचाच रेकॉर्ड मोडला आहे. केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये (Lulu Mall) मिड नाइट सेल ठेवण्यात आला होता. ही बातमी केरळमध्ये वाऱ्यासारखी पसरली. रात्री 12 वाजता लोक एकमेकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसले. मॉलमधील गर्दी अनियंत्रीत झाली. मॉमधील या तुफान गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
केरळच्या(Kerala) के लुलु मॉलमध्ये 50% डिस्काउंट अशी ऑफर ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मिड नाईट सेल ठेवण्यात आला. एवढ्या रात्री कोण खरेदीला येणार असे मॉल मॅनेजमेंटला वाटले. प्रत्यक्षात मात्र, रात्री 12 वाजता ग्राहक सुरक्षा रक्षकांना धक्के मारुन मॉलमध्ये घुसली. मॉलमध्ये लोकांनी अक्षरश: किड्या-मुंग्यांसारखी गर्दी पहायला मिळाली.
या सेलमुळे 6 जुलैच्या रात्री 11:59 वाजल्यापासून ते 7 जुलैच्या सकाळी पर्यंत मॉल उघडा होता. 50% डिस्काउंट अर्थात अर्ध्या किंमतीत वस्तु खरेदी करण्यासाठी लोकांनी मॉलमध्ये तुफान गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
Thread on some videos from #Lulumall, cochin !!
Looked like the entire Kochi was in the mall. Reminded me of Saravana stores, chennaipic.twitter.com/AscmYHFljM
— Vineeth K (@DealsDhamaka) July 8, 2022
व्हायरल व्हिडिओ मध्ये मॉलमध्ये किड्या-मुंग्यासारखी गर्दी दिसत आहे. मॉमधील ऑटोमॅटिक जिन्यांपासून मोकळ्या पॅसेजमध्येही ग्राहकांच्या न संपणाऱ्या रांगा दिसत आहेत. मॉलचा प्रत्येक काना-कोपरा गर्दीने भरलेला दिसत आहे. या अभूतपूर्व गर्दीला नियंत्रीत करताना मॉलमधील स्टाफच्या नाकी नऊ आले.
Remember iPhone launch queues ?
Here is our Kerala’s Lulu Mall sale queue at midnight:— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) July 9, 2022
सोशल मिडीयावर मॉमधील या गर्दीचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. अनेक जण हे व्हिडिओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. मॉलमध्ये फक्त ऑफर आहे कोणतीही वस्तु फुकट नाही मिळत आहे अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. लोकांच्या कमेंट्सनुसार या मॉमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारचे सेल लागल्याचे दिसून येत आहे. मॉलमधील एका स्टोरने स्टोरच्या ट्विटर हँडलवरुन याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. अनेक मॉमध्ये पावसाळ्यात विविध प्रकराचे सेल लागतात. मात्र केरळच्या या मिडनाईट सेल ने सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.