ड्रायव्हिंग म्हटलं की कुणालाही आवडते. अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या हातात खेळण्यांतील गाड्या असतात. त्यामुळे गाड्या चालवण्याची संधी मिळाली की कुणीही एका पायावर तयार होत असतो. या ड्रायव्हिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक जण निष्णात असतात, मग काहीजण अगदी डोंगर पठारावरही वेगाने गाडी चालवण्याचे कौशल्य दाखवतात. मग घाट असो किंवा कुठलेही धोकादायक वळण. ड्रायव्हरचा गाढा अनुभव असल्यामुळे ते कुठलेही आव्हान स्वीकारून स्टिअरिंगवर हात ठेवत असतात. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ड्रायव्हरने त्याच्या अप्रतिम धाडसाची झलक दाखवली आहे.
गाडीची मागील दोन चाके दरीच्या दिशेने झुकलेली असतानाही चालकाने अजब कौशल्य दाखवत गाडी वळवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही चालकाला दाद दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
कार चालकाने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मोठी दरी आहे, रस्ता फार अरुंद आहे. तरीही चालकाने कार वळवण्याचे धाडस केले आहे. एवढ्या अरुंद रस्त्यात आणि शेजारी दरी असताना चालक कार कशी काय वळवू शकतो, असा प्रश्न कुणालाही पडेल.
Unbelievable! Master driver! pic.twitter.com/1X1BTgkMuK
— The Figen (@TheFigen_) October 22, 2022
मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चालकाने हे आव्हान कशाप्रकारे लीलया पेलले आहे, याची प्रचिती येत आहे. कारच्या लांबीएवढीही रस्त्याची रुंदी नसताना चालकाने कारचा यु टर्न घेतला आहे.
निव्वळ प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आव्हानात्मक ड्रायव्हिंग केले आहे. त्याने ज्या प्रकारे दरीच्या किनारी कारचा बॅलन्स सांभाळला आहे, त्यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही.
एक इनोव्हासारखी एसयुव्ही रेंजची गाडी घाटरस्त्यात अडकली आहे. या स्पोर्ट्स कारमध्ये एकटा चालकच आहे. त्याला यु टर्न घेत घाटरस्त्यातून सुटका करून घ्यायची आहे. सोबत क्लीनर नसतानाही त्याला हे आव्हान पेलण्याचे धाडस करायचे आहे. पण सुरुवातीपासूनच त्याने या आव्हानाचे कसलेही भय बाळगलेले नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये चालकाची जिद्द आणि हिम्मत स्पष्टपणे दिसत आहे. गाडी ज्या ठिकाणी अडकली आहे, त्या ठिकाणी कुणी व्यक्तीदेखील नीट चालू शकत नाही. अशा खडतर मार्गावरून चालकाने आपल्या गाडीचा यु टर्न घेतला आहे.
चालकाच्या प्रसंगावधान आणि धाडसाला सोशल मीडियातून भरभरून दाद दिली जात आहे. त्यामुळेच धाडसी ड्रायव्हिंगचा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
ज्या लोकांना धाडसी ड्रायव्हिंगचे व्हिडिओ आवडतात, ते लोक वारंवार हा व्हिडिओ पाहत आहेत. त्याचबरोबर अनेक जण हा व्हिडिओ ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध माध्यमांतून शेअर करत आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ दोन करोडपेक्षा अधिक युजर्सनी पाहिला आहे.