TikTok स्टारचा कोलन कॅन्सरने मृत्यू, अखेरच्या दिवसांमध्ये आजाराबद्दल केली जनजागृती

| Updated on: Jan 26, 2023 | 6:23 PM

टीकटॉकवर फेमस असलेल्या बापलेकांच्या फेमस जोडीतील बापाचा कॅन्सरने मृ्त्यू झाला आहे. या बापलेकाच्या जोडीने अनेक घटनांवर मजेशीर व्हीडीओ बनवले आहेत.

TikTok स्टारचा कोलन कॅन्सरने मृत्यू, अखेरच्या दिवसांमध्ये आजाराबद्दल केली जनजागृती
tiktok
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : Enkyboys नावाने प्रसिद्ध असलेल्या पितापूत्रांची जोडीतील टीकटॉक स्टार पित्याच्या कोलन कॅन्सरने मृत्यू झाला आहे. रँडी गोंझालेझ वय 35 हे गेल्या काही वर्षांपासून कोलन कॅन्सरने पिडीत होते. त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे. त्यांना स्टेज 4 चा कोलन कॅन्सर झाला होता. त्यांनी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांना हा कोलन कॅन्सर या दुर्धर आजाराचे निदान झाल्याचे सांगत ते केवळ दोन ते तीन वर्षेच जगू शकतात असे जाहीर केले होते. त्यामुळे टीकटॉक या माध्यमाचा वापर त्यांनी प्रबोधन आणि जनजागृतीकरीता केला.

टीकटॉक अकाऊंट एन्कीबॉयज् द्वारे रँडी यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना सहा महिन्यांपूर्वी याची कल्पना दिली होती होती. त्यानंतर त्यांनी सर्व व्हीडीओ या आजाराबद्दल जनजागृती केली होती. टीकटॉक प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यापासून, जोडीने 1 कोटी 54 लाख फॉलोअर्स मिळवले आणि 29 कोटी पेक्षा जास्त लाईक्स त्यांच्या पोस्टना मिळाले आहेत. त्यांच्या एका जवळच्या कौटुंबिक मित्राने स्टेज – IV कोलन कर्करोगाशी असलेली झुंज संपल्याने त्यांचा हॉस्पिस केअरमध्ये मृत्यू झाला.

 बापलेकांची फेमस जोडी

टीकटॉकवर ही बापलेकांची जोडी फेमस होती. त्यांनी अनेक घटनांवर मजेशीर व्हीडीओ बनवले. गाणी तसेच स्किप्ट सादर केले. मूव्ही क्लिपसाठी व्हॉइसओव्हर आणि लिप-सिंकिंग व्हिडिओ शेअर केले. अनेकदा गोन्झालेझ त्याच्या चाहत्यांशी त्यांच्या कर्करोगाच्या झालेल्या निदानाबद्दल खुलेपणाने बोलत होते, त्यांनी एप्रिल 2022 मध्ये समाजमाध्यमावर सांगितले होते की आता त्यांच्याकडे केवळ दोन ते तीन वर्षे शिल्लक आहेत.

मुलगा आहे अभिनेता

रॅंड यांचा लहान मुलगा ब्रिस हा बालअभिनेता आहे. त्याने लोपेझ व्हर्सेस लोपेझ ( Lopez vs Lopez ) या कॉमेडी मालिकेतून गेल्यावर्षी  पदार्पण केले, स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता जॉर्ज लोपेझ यांची हा मालीका प्रसिद्ध आहे. एका हॉलीवूडपटातही त्याल ब्रेक मिळाला आहे. त्याने वडीलांसोबत अनेक व्हीडीओ केले आहेत.

कोलन कॅन्सर म्हणजे काय ?

कोलन किंवा कोलोरेक्टल हा सुद्धा कर्करोगाचा एक प्रकार आहे. याला मोठ्या आतड्याचा कर्करोग असेही म्हणतात. या कर्करोगाबद्दल लोकांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. अन्य कर्करोगाप्रमाणे हा सुद्धा अतिशय जीवघेणा ठरू शकतो. मात्र, या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे.