एनर्जी ड्रींक प्रमोट करण्याच्या नादात तोडली कोट्यवधीची Lamborghini

| Updated on: Mar 06, 2023 | 3:37 PM

आजकाल लोक वेगवेगळे व्हिडीओ तयार करून प्रसिद्ध होताना दिसत आहेत. एका रशियन युट्युबरने आपल्या कोट्यधीच्या कारचा कसा केला चुराडा पाहा

एनर्जी ड्रींक प्रमोट करण्याच्या नादात तोडली कोट्यवधीची Lamborghini
Lamborghini
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  सोशल मिडीयावर कधी कोण काय करील हे सांगता येत नाही. अनेक अजब आणि गजब व्हिडीओने सोशल मिडीयावर अक्षरश: पूर आलेला  आहे. हे व्हिडीओ इतके वेगळे आहेत ते पाहून सोशल मिडीयावरील चाहते हैराण होत असतात. तसेच काही जण रातोरात सोशल मिडीया स्टार होण्यासाठी अनेक हटके व्हिडीओ टाकत असतात. असाच एक महागड्या लॅम्बोर्गिनी गाडीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे

सोशल मिडीयावर काही वेगळे करून दाखविण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. अलिकडेच असाच एक वेगळा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक जण आपली चमकती पांढऱ्या रंगाची   (Lamborghini Urus SUV)  कार एका झटक्यात बरबाद करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकीत होताना दिसत आहेत.

अलिकडेच एका रशियन युट्युबरने केलेला व्हीडीओ चर्चेचा विषय बनला आहे. यात आपल्या नव्या चमचमत्या गाडीचा एका झटक्यात चुराडा करताना युट्युबर दिसत आहे. या रशियन युट्युबरचे नाव मिखाईल लिटविन असे आहे. हा व्हिडीओ एका जाहीरातीच्या शूटसाठी तयार केला आहे. ज्याला पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडीओतील व्यक्ती एका एनर्जी ड्रींकची जाहीरात करताना करोडोच्या कारचा चक्काचूर करताना दिसत आहे. भारतात या कारची सुरूवातीची किंमतच सव्वा तीन कोटी आहे.

हाच तो व्हिडीओ पाहा…

 

व्हिडीओमध्ये स्टंटचा सेटअप दिसत आहे. एका मोठ्या क्रेनला एनर्जी ड्रिंक लटकलेले दिसत आहे. या व्हिडीओत तो तरूण धावत समोर येताना दिसत आहे. जसा हा तरूण पुढे येतो तसे क्रेनला लटकलेले एनर्जी ड्रींक या महागड्या कारवर धडाम आवाज करीत कोसळते. त्यामुळे कोट्यवधीची कार एका क्षणात नष्ट होताना दिसत आहे. हे दृश्य केवळ एनर्जी ड्रींकच्या जाहीरातीसाठी केलेले आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडीओला mikhail_litvin या अकाऊंटवरून शेअर केले आहे. या व्हिडीओला आता पर्यंत 7 लाख लोकांनी पाहिले आहे. तर 3 लाख 11 हजार जणांनी लाईक्स केले आहे. युजर त्यावर मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत.