मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल (Jugaad Video) होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही. कधी कोणी घरी बसून हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कधी कोणी घरी बसून स्कूटर तयार करीत आहे. सध्या एक व्हिडीओ (Video viral) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून प्रत्येकजण हैराण झाले आहेत. ज्या व्यक्तीने हा जुगाड (trending video) केला आहे, त्याचं कौतुक सुध्दा लोकं करत आहेत. सध्या पावसाळा सुरु होत आहे, त्यामुळे कोणीची गाडी कुठे अडकली तर त्या व्यक्ती गाडी बाहेर काढण्यासाठी या व्हिडीओची मदत नक्कीचं होणार आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक गाडी चिखलात अडकली आहे. त्या गाडी काढण्याचा चालक प्रयत्न करीत आहे. त्या चालकाने लाकडाचा तुकडा गाडीच्या चाकांना बांधला आहे. त्या लाकडाला इतक्या मजबूत स्थितीत बांधलं आहे की, ते लाकूड अजिबात हलचाल करीत नाही. जशी ती गाडी पुढे जात आहे. त्याचपद्धतीने ते लाकूड बाजूचा चिकलं दूर सारत आहे. त्याचबरोबर चिखलात अडकलेली गाडी कसल्याही त्रासाशिवाय त्यातून बाहेर येत आहे.
How to drive a stuck car out of the mud pic.twitter.com/N9sywAlA1a
— Learn Something (@EducationalPixs) June 22, 2023
हा जुगाड लोकांना अधिक पसंतीला पडला आहे. त्याचबरोबर हा जुगाड लोकांच्या कामाचा देखील आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @EducationalPixs नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला लोकांनी अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, हा कमालीचा जुगाड आहे. दुसरा नेटकरी म्हणत आहे की, ही खूपचं भारी आयडिया आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा.