VIDEO | मुलगी व्हिडीओ बनवत होती, हत्तीला ते आवडलं नाही, त्याने सोंड वळवून तोंडावर मारली

| Updated on: Jan 16, 2023 | 7:55 AM

विशेष म्हणजे सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी अनेक लोकं प्राण्याचे व्हिडीओ तयार करतात. परंतु व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण काळजी घेतील असं वाटतंय.

VIDEO | मुलगी व्हिडीओ बनवत होती, हत्तीला ते आवडलं नाही, त्याने सोंड वळवून तोंडावर मारली
Elephant Hit Girl By Trunk Video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ (Viral video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलगी हत्ती जवळ असताना व्हिडीओ तयार करीत आहे. त्यावेळी हत्तीला राग आला (Elephant Hit Girl By Trunk Video) आणि त्यानंतर काय झालं ते व्हिडीओत पाहा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. काही लोकांनी त्यावर कमेंट करुन मोबाईल कुठं कसा वापरायला हवा याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत 80 हजार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. काही लोकांनी तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी अनेक लोकं प्राण्याचे व्हिडीओ तयार करतात. परंतु व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण काळजी घेतील असं वाटतंय.

नेमकं व्हिडीओत काय आहे

संबंधित व्हिडीओत पाच लोक दिसत आहेत. त्यापैकी दोन मुली हत्तीच्या सोंडेला हात लावत आहेत. त्याचवेळी तरुण एका बाजूने शुटींग करीत आहे. त्यानंतर हत्तीचं लक्ष मोबाईलमध्ये शुटींग करणाऱ्या तरुणीकडं जात. हत्ती सोंड मागे घेतो आणि जोरात मुली तोंडावर आणि मोबाईलवरती मारतो. त्यावेळी त्या मुलीचा मोबाईल तिच्या हातातून खाली पडतो.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला आतापर्यंत80 हजार लोकांनी पाहिले आहे. @TheBest_Viral या अकाऊंटवरुन व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. अनेक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत.