VIDEO | मुलगा बनला वडिलांची गर्लफ्रेंड, म्हणाला ‘तुम्ही ज्या पुजा शर्माला चहा पिण्यासाठी बोलावलं आहे, ती पुजा शर्मा…

| Updated on: Mar 20, 2023 | 11:40 AM

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुलगा चहा पीत आहे. त्या मुलाचे वडील बाहेर जाण्यासाठी तयार होत आहेत. त्याचबरोबर ते स्वत:ला आरशात एकदम निरखून पाहत आहेत. त्यावेळी मुलगा आपल्या वडिलांशी गप्पा मारत आहे. मुलगा म्हणतो पप्पा तुम्हाला माहित आहे का ? माझी फेसबुकला १५ अकाऊंट आहेत.

VIDEO | मुलगा बनला वडिलांची गर्लफ्रेंड, म्हणाला तुम्ही ज्या पुजा शर्माला चहा पिण्यासाठी बोलावलं आहे, ती पुजा शर्मा...
viral news son and father
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) लोकांच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. त्यावरती रोज असंख्य व्हिडीओ (Viral Video) येतात, त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. त्याचबरोबर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना सुध्दा बरं वाटतं असं अनेकदा दिसून आलं आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही दिवसभर हसत राहणार एवढं मात्र नक्की, त्याचबरोबर तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट सुध्दा कराल. सोशल मीडियावर रोज असे असंख्य व्हिडीओ (funny video) पाहायला मिळतात. त्याचबरोबर व्हायरल सुध्दा होतात.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या वडिलांची मजा घेताना दिसत आहे. त्या मजाक आपण काय त्याचे वडीलांनी सुध्दा तेवढा विचार केला नसेल. विशेष म्हणजे त्या व्हिडीओतला मुलाचा आत्मविश्वास अनेकांना आवडला आहे. हे सगळं पाहून नेटकरी हसत आहेत. लोकं म्हणतात आम्ही विचार सुध्दा करु शकत नाही, मुलगा अशी पद्धतीने वडिलांची मज्जा घेईल.

हे सुद्धा वाचा

त्या व्हायरल व्हिडीओत मुलगा चहा पिताना दिसत आहे. त्याचे वडिल बाहेर जाण्यासाठी तयारी करीत आहेत. त्याचे वडिल आरशात तयारी करीत असल्याचे पाहून मुलगा वडिलांना आवाज देतो. वडिलांना मुलगा सांगतो की, त्याचे फेसबुकला 15 फेक आयडी आहेत. त्यावर त्याचे वडिल त्याला विचारतात की, ही गोष्ट तु मला का सांगत आहेस.

त्यानंतर तो मुलगा हसत-हसत वडिलांना सांगतो. दहा दिवसांपासून तुम्ही ज्या पूजा शर्माला चहासाठी आमंत्रण देत आहात, ती पुजा शर्मा मीचं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर वडील मुलावर प्रचंड संतापतात आणि मुलाला मारहाण करण्यास सुरुवात करतात. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही, एवढं मात्र नक्की. तो मुलगा अनेक दिवसांपासून आपल्या वडिलांशी चॅट करीत होता. त्याचे वडिल त्याच्याशी खरी मुलगी असल्याचं समजून चॅट करीत होते. दोघांच्यात ज्यावेळी चर्चा वाढली. त्यावेळी वडिलांनी थेट चहा पिण्यासाठी बोलावलं आहे.

विशेष आपल्या वडिलांची खरी स्टोरी सांगण्यासाठी मुलाने तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याचबरोबर लोकांना हा व्हिडीओ सुध्दा आवडल्याचं लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.