नवी दिल्लीः महाराष्ट्रात जुळ्या बहिणीनी एकाच मुलाबरोबर लग्न केल्यानंतर त्या विवाहाचीही जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील एका आगळ्यावेगळ्या विवाहामुळे ती दोन्ही दांपत्य चर्चेत आली आहेत. पश्चिम बंगालमधील बर्दवानमध्ये जुळे भाऊ आणि जुळ्या बहिणींची एकत्र लग्न झाल्यामुळे या विवाहची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पश्चिम बंगालमधील लव-अर्पिता आणि कुश-परमिता यांचा विवाह पूर्व बर्दवानमधील कुरमून गावामध्ये मंगळवारी मोठ्या थाटामाटात झाला. एकाच वेळी जन्मलेले, एकत्रच वाढलेले त्यामुळे त्यांची लग्नही एकाच वेळी झाली आहेत.
यामधील अर्पिता थोडी मोठी आहे तर परमिता लहान आहे. लहानपणापासूनच दोन्ही बहिणींचा अभ्यास, त्यांचं फिरणं, आणि त्या एकत्रच वाढल्या आहेत. या दोघींनीही बर्दवानमधील भटार गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले असून त्यांनी त्याच कॉलेजमधून पदवीही घेतली आहे.
या विवाहाविषयी अर्पिता आणि परमिता सांगतात की, आम्ही दोघीही लहानपणापासून एकत्र वाढलो आहे. त्यामुळे त्या सांगतात की, आम्हा दोघी बहिणींनी एकाच घरात लग्न करायचे ठरवले होते.
त्यामुळे आपल्या मनातील इच्छा त्यांनी आपल्या आई वडिलांनाही सांगितले होती. त्यानंतर त्यांच्या पालकांनीही त्यांच्यासाठी अशीच स्थळं बघण्यासाठी चालू केली होती.
या विवाहाविषयी त्यांचे पालक सांगतात की, जेव्हा आपल्या दोन्ही मुलींनी आपल्या लग्नाविषयी सांगितले. त्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे त्या दोघींना आम्ही एकाच घरामध्ये देण्यासाठी त्या तसे स्थळ शोधत होतो.
आणि तसेच स्थल आम्हाला कुरमूनमध्ये मिळाले. त्यानंतर लव आणि कुश पाकरे यांची भेट झाली. त्यानंतर लग्नासाठी आम्ही तशी चर्चाही केली आणि 5 डिसेंबर विवाहाची तारीख ठरली आणि दोघी बहिणींची लग्न मोठ्या थाटामाटात एकत्रच करुन दिली.