चालू गरब्यात मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, उपटल्या एकमेकींच्या झिंज्या

| Updated on: Oct 04, 2022 | 9:46 PM

अनेक नागरिकांनी हा वाद सोडवण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत विविध कॉमेंट करत होते. मुली त्यावेळी अक्षरशः एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या.

चालू गरब्यात मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, उपटल्या एकमेकींच्या झिंज्या
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : सध्या सोशल मीडियावर (Social Media) गरबा सुरू असतांना मुलींच्या दोन गटातील हाणामारीचा व्हिडिओ तूफान व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ नाशिकच्या इगतपुरी (Nashik Igatpuri) येथील असल्याचा म्हणून शेयर केला जात आहे. याशिवाय तो उत्तरप्रदेशातील असल्याचा म्हणून देखील शेयर केला जात आहे. मात्र, याची अद्यापपर्यन्त पुष्टी झालेली नसून दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याचे देखील बोलले जात आहे. चालू गरब्यात मुलींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस नागरिक रात्रीच्या वेळी गरबा खेळत असतात. गरबा खेळत आनंद लुटण्याची ही एक पर्वणीच असते. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये दिसून येत असतो. इगतपुरी येथे अशाच स्वरूपात गरबाचे आयोजन करण्यात आले होते असा मजकूर टाकून नागरिक व्हिडिओ शेयर करत आहेत. त्यामध्ये  तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी दिसून येत आहे. तरुणींचा हा हाणामारीचा सोशल मीडियावर व्हायरल करत नेटकरी विविध प्रकारच्या कॉमेंट करत आहे.


या व्हिडिओमध्ये गरबा खेळत असतांना दोन मुलींमध्ये सुरुवातीला गरबा खेळतांना वाद झाला होता. वाद मिटवण्याऐवजी दोन्हीही मुलींमध्ये शिवीगाळ सुरू होती.

त्याच दरम्यान दोन्ही मुली आपपसात भिडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्यावेळी अनेक नागरिक त्यांची ही हाणामारी पाहतच होते.

हे सुद्धा वाचा

अनेक नागरिकांनी हा वाद सोडवण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत विविध कॉमेंट करत होते. मुली त्यावेळी अक्षरशः एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या.

यावेळी सोबतीला असलेल्या मैत्रिणी हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण दोन्ही मुली एकमेकांना सोडत नसल्याने इतर मुलींनी हाणामारीत सहभाग घेतला आणि तूफान हाणामारी झाली.

काही वेळानं उपस्थित महिला पुरुषांनी ही हाणामारी सोडवली होती, परंतु नाशिकच्या इगतपुरी म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची सत्यता समोर नाहीये. मात्र, नागरिक इगतपुरी, उत्तरप्रदेश आणि गुजरात येथील असल्याचा म्हणत व्हायरल करत आहे.

याशिवाय नेटकरी हा व्हिडिओ शेयर करत मजेशीर प्रतिक्रिया मांडत असून गरब्यातील हाणामारीचा व्हिडिओच चर्चेचा विषय ठरत आहे.