मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : सोशल मिडीयावर अनेकवेळा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ वाईल्ड लाईफचे असतात. जंगलातील हिस्र प्राण्यांचे हे व्हिडीओ अनेकवेळा महत्वाचे असतात. जंगतात शिकार करण्यासाठी जेवढे परीश्रम जंगली प्राण्यांना करावे लागतात. तेवढे परिश्रम शिकार इतर प्राण्यांपासून वाचविण्यासाठी करावे लागतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यातून माणसालाही शिकण्यासारखे आहे.
जंगलात अनेकदा शिकार बिबटे किंवा वाघ आणि सिंह करीत असतात. परंतू फायदा सरसांचा होत असतो. ते झुंडीने आयती शिकार मिळण्याची वाटच पहात असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात एकमेकांशी केलेली लढाई नेहमी दुसऱ्याचा फायदा करुन देते असे हा व्हिडीओ पाहाताना कळते. या व्हिडीओला इस्टाग्रामवर 86 हजाराहून अधिक लोकांनी पाहीले आहे. पाच हजाराहून अधिक युजरनी लाईक्स केले आहे. एका युजरने म्हटले आहे की जंगलाचा आपला कायदा आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की बाप आणि मुलाच्या भांडणात तरसांची मज्जा झाली आहे.
या व्हिडीओत आपण पाहू शकता की दोन बिबटे ( पिता-पूत्र ) शिकार केल्यानंतर झाडावर चढून त्या शिकारीवर ताव मारणार असतात. आणि झाडाखाली तरस त्यांची काही चूक होते की नाही हे पाहत झुंडीने वाट पाहात असतात. अचानक एक बिबटा झाडावरुन पडतो. त्यानंतर दुसऱ्या बिबट्याच्या तोंडातील शिकारही खाली पडते. सरस याच संधीची वाट पाहत आयत्या शिकारीवर तुटून पडतात. आता दोन्ही बिबट्यांना हात झडकत आणि लाळ काढत तेथून निघण्याशिवाय काही पर्याय नसतो. दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ झालेला असतो.
हाच तो व्हिडीओ –
हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेजवर @dulinilodge खात्यावरुन 9 जुलै रोजी पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शन लिहीली आहे की बिबट्या तरसांच्या घोळक्यात पडला. किती जबरदस्त सीन होता. जेव्हा रेवेन्सकोर्ट आणि त्याचा मुलगा ह्लांबेला जॅकलबेरीच्या झाडावर शिकारीवरुन भांडले…परंतू शेवटी झाडाच्या खाली हजर असलेल्या तरसांची मौज झाली. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन व्हायरल होतोय.