या टॅक्सीचालकाने असं काय केलं, की रातोरात झाला प्रसिद्ध?, वाचा सविस्तर

| Updated on: Mar 22, 2021 | 3:54 PM

प्रसिद्ध पत्रकार अभिजीत मजूमदार यांनी ट्विटरवर एक माहिती शेअर केल्यामुळे एक टॅक्सीचालक चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. (sarwan kumar journalist abhijit majumdar)

या टॅक्सीचालकाने असं काय केलं, की रातोरात झाला प्रसिद्ध?, वाचा सविस्तर
SARWAN KUMAR
Follow us on

कोलकाता : आजकाल डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जेवणापासून ते प्रवासापर्यंतच्या कामासाठी आपण डिजीटल माध्यमांची मदत घेत आहोत. ओएलए, उबेर सारख्या कंपन्या प्रवाशांना उत्तमातील उत्तम टॅक्सी अपलब्ध करुन देतातयत. कधी प्रवाशांना या टॅक्सीचालकांकडून चांगली सर्व्हीस मिळते. तर कधी चालकांच्या असभ्यपणाच्या वागणुकीमुळे प्रवाशांना त्राससुद्धा झाला आहे. मात्र, प्रसिद्ध पत्रकार अभिजीत मजूमदार (Abhijit Majumdar) यांनी ट्विटरवर एक माहिती शेअर केल्यामुळे एक टॅक्सीचालक चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. आपल्या इमानदारीमुळे हा हा टॅक्सी चालक  रातोरात स्टार झाला आहे. (Uber cab driver Sarwan Kumar return the bang of journalist Abhijit Majumdar contains macbook and cash)

नेमका प्रकार काय?

सरवन कुमार (Sarwan Kumar) नावाचा टॅक्सीचालक उबेर कंपनीमध्ये कामावर आहे. तो रोज अनेक प्रवाशांची ने आण करतो. त्यांना इप्सीत स्थळी पोहचवतो. एकदा प्रसिद्ध पत्रकार अभिजित मुजूमदार यांना घेऊन तो कोलकात्यावरुन निघाला. मात्र, टॅक्सीचालक सरवन कुमार निघून गेल्यांनतर मुजूमदार यांना त्यांची गंभीर चूक लक्षात आली. ते त्यांची बॅग टॅक्सीमध्येच विसरले होते. या बॅगमध्ये एक मॅकबुक, काही रोख रक्कम, चाव्या आणि काही पुस्तकं होती. त्यांनी लगेच सरवन कुमार यांना फोन करुन माझी बॅग टॅक्सीत विसरल्याचे सांगितले. हा टॅक्सीचालक आता बॅग घेऊन पळून जातो, अशी शंका मुजूमदार यांना आली.
मात्र, सरवन कुमार हा टॅक्सीचालक रात्रीचा प्रवास करुन त्याच दिवशी मुजूमदार यांच्या घरी आला. टॅक्सीचालकाने मुजूमदार यांची बॅग जशीच्या तशी परत केली. बॅगमधील सर्व सामान जसेच्या तसे परत मिळाल्यानंतर मुजूमदार यांना हायसे वाटले.

पत्रकार अभिजीत मुजूमदार यांनी ट्विट करत टॅक्सीचालकाच्या इमानदारीबद्दल माहिती दिली :

दरम्यान, हा सर्व प्रकार मुजूमदार यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. सोबत सरवन कुमार या ड्रायव्हरचा फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे. अभिजीत मुजूमदार यांनी हा फोटो पोस्ट करताच, काही वेळेत या टॅक्सीचालकाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. टॅक्सी चालकाच्या ईमानदारीची सर्वत्र स्तुती होत आहे.

इतर बातम्या :

#JanataCurfew | जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, फोटो व्हायरल

उद्योगपती हर्ष गोयंकांनी हा फोटो पाहून सॅल्युट केला, काय आहे हा फोटो?

Aadhaar Card : आधारकार्डचा फोटो बदलायचा आहे? वापरा ‘ही’ सोपी पद्धत

(Uber cab driver Sarwan Kumar return the bang of journalist Abhijit Majumdar contains macbook and cash)