हौसेने 4 कोटींचं घर घेतलं, तरीही बेघर झाले, खिडकी उघडली अन्…

| Updated on: Dec 24, 2024 | 2:06 PM

यूकेतील एका दाम्पत्याने चार कोटी रुपयांचे घर खरेदी केले. परंतु ते या घरात जाऊच शकले नाहीत. या जोडप्याने आपल्या संपूर्ण आयुष्यभराची बचत घरात खर्ची घातली. मनासारखं घर घेतलं. आता राहायलाच जायचं बाकी होतं. सामानाची बांधाबांध केली. घरात राहायला गेले, त्यानंतर बायकोने सहज म्हणून खिडकी उघडली अन्...

हौसेने 4 कोटींचं घर घेतलं, तरीही बेघर झाले, खिडकी उघडली अन्...
हौसेने 4 कोटींचं घर घेतलं, तरीही बेघर झाले
Image Credit source: Tv9
Follow us on

प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं. मनासारख्या ठिकाणी, मनाप्रमाणं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे घर घेण्यासाठी लोक आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करतात. जेव्हा एवढा पैसा खर्च करून घराच्या चाव्या हातात येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. पण चार कोटीचं घर खरेदी करूनही बेघर असाल तर? धक्का बसला ना? एका दाम्पत्याबाबत असंच काही तरी घडलंय. चार कोटीचं घर घेतल्यानंतरही हे जोडपं बेघर झालंय. काय घडलं त्यांच्या बाबत?

द मिररमध्ये हे वृत्त आलंय. त्यानुसार, यूनायटेड किंगडममध्ये राहण्याऱ्या एका जोडप्याने घरासाठी आपली आयुष्यभराची पूंजी खर्च केली. संपूर्ण पैसा खर्च केल्यावर त्यांनी घर घेतलं. आपल्या स्वप्नातील घर मिळाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यांना आता कधी आपण नव्या घरात शिफ्ट होतोय आणि कधी नाही असं झालं होतं. त्यानुसार ते शिफ्टही झाले. पण शिफ्ट झाल्यावर त्यांना भयंकर पश्चात्ताप झाला. आपले पैसे पाण्यात गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. असं कधी होईल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

असं काय होतं घरात?

वॉल्टर ब्राऊन आणि त्याची पत्नी शेरॉन यांनी हे घर विकत घेतलं होतं. पण नवीन घर पाहिल्यावरच त्यांना हे घर सोडून जावं लागलं. आम्ही हे घर घेतलं. पण आम्हाला ते लगेच सोडावं लागलं. आमच्या आयुष्याची सर्व पूंजी 3 कोटी 84 लाख रुपये गमवावे लागले. आम्ही घर खरेदी केलं आणि घरात गेल्यावर खिडकी उघडताच आम्हाला समोर कचऱ्याचा प्रचंड ढिग दिसला. त्यामुळे आम्ही तात्काळ घर सोडून तिथून पलायन केलं, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

घर खरेदी करताना आम्ही कचऱ्याचा ढिग पाहिला होता. याबाबत आम्ही डेव्हरपर्सकडे तक्रार केली होती. त्यावेळी तुम्ही हे घर खरेदी करा. पेमेंट मिळाल्यावर हा कचरा हटवण्याची जबाबदारी माझी राहील असं तो म्हणाला. आता या गोष्टीला अनेक दिवस झाले. पण कचऱ्याचा ढिग आहे तसाच आहे. तो अजूनही हटवला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

केवळ लालसेपोटी आम्ही हे घर खरेदी केलं. एवढ्या रकमेत या परिसरात घर मिळणं कठिण आहे. एवढेच नव्हे तर आम्ही ज्या परिसरात घर घेतलं, तिथं एक साधी पक्की सडकही नाहीये. कच्चे रस्ते आहेत. तरीही आम्ही कमी पैशात मिळतंय म्हणून घेतलं आणि आमची फसवणूक झाली, असं या जोडप्याचं म्हणणं आहे.