दिल्ली : आई-वडिल होणं ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते. बाळ जन्माला येणाआधीच आई-वडिल मुलाच्या नावाचा विचार करत असतात. नाव ठेवताना नावाला महत्व असले पाहिजे किंवा ते अर्थपूर्ण असले पाहिजे यावर पालकांचा भर असतो. यामुळे मोठ्या आवडीने आणि खूप विचार करुन मुलांचे नाव ठेवतात. मात्र, ब्रिटनमधील एका जोडप्याने आपल्या बाळाचे नाव एका भारतीय डिशवरुन ठेवले आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव पकोडा असे ठेवले आहे.
या जोडप्याला पकोडे इतके आवडतात की त्यांनी डायरेक्ट आपल्या मुलीचेच नाव पकोडा ठेवले आहे. द कॅप्टन्स टेबल हे आयर्लंडमधील न्यूटाउन अब्बे येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये जगात पहिल्यांदाच ठेवण्यात आलेल्या या अनोख्या नामकरणाची माहिती देण्यात आली आहे.
हे रेस्टॉरंट आपल्या सोशल मीडिया पेजवर रेसिपीसह अनोख्या आणि इंटरेस्टींग बातम्या देखील शेअर करते. एक जोपडं नेहमी या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घ्याला यायचे. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारी पकोडा ही भारतीय डिश या जोडप्याचा फेव्हरेट पदार्थ आहे. यामुळे या जोडप्याने आपल्या मुलीचेच नाव पकोडा असे ठेवले आहे.
रेस्टॉरंटने नवजात मुलीचा फोटो शेअर करत जोडपल्याने ठेवलेले पकोडा हे नाव सोशल मिडीयावर शेअर केले आहे. रेस्टॉरंटने बिलाच्या पावतीचा फोटोही शेअर केला होता ज्यात काही पदार्थांची नावे होती ज्यात ‘पकोडे’ याचाही समावेश आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी जोडप्याचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ट्विवटर वर बेबी पकोरा या टैगने ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.
UK parents name their child after Indian dish 'Pakora'; Internet just can't keep calm
Read @ANI Story | https://t.co/tXGvA2A9zf#Pakora #Ireland #Funnymemes pic.twitter.com/AN9mljgClS
— ANI Digital (@ani_digital) September 3, 2022