VIDEO | काकांनी ऐश्वर्या रायच्या गाण्यावर लाजत-लाजत डान्स केला, स्टाईल पाहून नेटकरी म्हणाले…

| Updated on: Apr 06, 2023 | 11:49 AM

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती @aylogyworld या नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी पण पाहिलाय, तुम्ही पण पाहा...' त्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 66 हजार लोकांनी लाईक केले आहे.

VIDEO | काकांनी ऐश्वर्या रायच्या गाण्यावर लाजत-लाजत डान्स केला, स्टाईल पाहून नेटकरी म्हणाले...
DANCE
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाले आहेत. मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीचे डान्स करीत असल्याचे सुध्दा अनेक व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. माहित नाही , पण अनेक पुरुष सध्या महिलांसारखे डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अर्जून रामपाल या एक चित्रपट माहित असेल ? ‘दिल का रिश्ता’ (2003) तुम्हाला आठवत सुध्दा असेल. त्या चित्रपटातील ‘दय्या-दय्या…’ हे गाणं लागल्यावर अनेकजण गुणगुणतात. त्या गाण्यात ऐश्वर्या रायने चांगला डान्स केला होता. इंस्टाग्रामवरती रील पाहत असताना आम्हाला एक व्हिडीओ मिळाला आहे. त्यामध्ये एक अंकल त्या गाण्यावर तुफान डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अंकल लाजत-लाजत डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती @aylogyworld या नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मी पण पाहिलाय, तुम्ही पण पाहा…’ त्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 66 हजार लोकांनी लाईक केले आहे. नेटकरी मजेदार कमेंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मुलींचा रोजगार काकांनी हिसकावून घेतला. दुसरा नेटकरी म्हणतो, आयुष्य असचं जगायला हवं, तिसरा नेटकरी म्हणतो, काकांना भारतरत्न द्यायला हवा, आणखी एकजण म्हणाला त्यांच्या अंगातरी ऐश्वर्या जागी झाली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही काका कशापद्धतीने लाजून-लाजून डान्स करीत आहेत, पाहायला मिळत आहे. काका खरंच एखाद्या मुलीसारखे लाजून डान्स करीत आहेत. त्याचबरोबर काका आपली कमर सुध्दा खूप मजेदार पद्धतीने हालवून दाखवत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं आहे.