VIDEO |’सजना है मुझे सजना के लिए..’80 वर्षांच्या काकांचा डान्स पाहून पोरांना घाम फुटला

| Updated on: Aug 21, 2023 | 2:38 PM

Break Dance | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका काकांचा डान्स पाहून अनेकांना घाम फुटला असल्याचं कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.

VIDEO |सजना है मुझे सजना के लिए..80 वर्षांच्या काकांचा डान्स पाहून पोरांना घाम फुटला
Uncle Doing Break Dance At The Age Of 80
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाची अट लागत नाही असं अनेकदा म्हटलं जात. हे वयोवृध्द (Uncle Doing Break Dance At The Age Of 80) लोकांनी चांगलं काम केल्यानंतर अनेकदा म्हटलं जातं. जो नेहमी मनाने ताजा असतो. तो वयाने कधीही म्हतारा होत नाही. असाचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी एक वयोवृध्द व्यक्ती रस्त्यात ब्रेक डान्स (Break Dance Viral) करीत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा त्या व्यक्तीचं कौतुक करालं. त्या व्यक्तीचा डान्स पाहून अनेकांना धक्का बसला आहे. लोकांनी हा व्हिडीओ (trending video) पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.

काकांचा डान्स आणि लोकांची चर्चा

Udaipurvisit नावाच्या एका इंन्स्टाग्राम खात्यावरून 75-80 वर्षाच्या एका व्यक्तीचा ब्रेक डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. तिथं अजून काही कलाकार डान्स करीत आहेत. ‘सजना है मुझे सजना के लिए’ या गाण्यावर काकांनी चांगला डान्स केला आहे. त्या व्हिडीओमध्ये काकांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. कानात एअरफोन घातलेले काका कसलचं कारण नसताना बिनधास्त नाचत आहेत. काकांचा डान्स पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

काकांसारखं मस्त राहायचं

काकांच्या त्या व्हिडीओला ५७ हजार लोकांनी लाईक केले आहे. लोकांनी त्या व्हिडीओ अधिक कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर काकांचं कौतुक देखील केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे की, मी त्यांना एकदा उदयपूरमधून प्रवास करीत असताना भेटलो होतो. ते खूप मोठं व्यक्तीमत्त्व आहे. ते गाणे सुध्दा गात असल्याचं एकाने म्हटलं आहे. आणखी एकाने लिहीलं आहे की, “काका फक्त आनंदी असायला हवेत. खूपचं चांगला डान्स करीत आहेत. त्यांनी असचं हसतं राहायला हवं” आणखी एकाने लिहीलं आहे की, काका मिल्ट्रीत नोकरीला होते.