VIDEO | जुगाडकरुन बाईक बनवली, पाण्यात गेल्यावर बनते बोट, लोकं म्हणतात, ‘गाडी बनवताना अधिक डोकं वापरलय’

| Updated on: Jun 22, 2023 | 1:01 PM

सध्या एक बाईक सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. काही देशातील लोकांनी या बाईकची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या बाईकचा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे.

VIDEO | जुगाडकरुन बाईक बनवली, पाण्यात गेल्यावर बनते बोट, लोकं म्हणतात, गाडी बनवताना अधिक डोकं वापरलय
Jugaad Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. कधी कोणी घरी बाईक तयार करतोय, कधी काहीजण घरी कार तयार करतो. तरी काहीजणांनी कारला हेलिकॉप्टर (Jugaad Video) तयार केलं आहे. जुगाड करुन तयार केलेल्या वस्तू सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्या आहेत. सध्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. ज्या व्यक्तीने जुगाड करुन बाईक तयार केली आहे. त्या व्यक्तीचं सगळे कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडीओ (trending video) पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा मजा येईल. अशा पद्धतीची बाईक तयार करण्याचा कुणी विचार सुध्दा केला नसेल, अशा पद्धतीच्या अनेक कमेंट आल्या आहेत.

डोळ्यावर विश्वास राहणार नाही

त्या व्यक्तीचा जुगाड पाहून लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास राहणार नाही. हा व्हिडीओ ट्विटरवरती @pareekhjain नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘बाईक कम बोट’ आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काळ्या रंगाच्या गाडीत बसला आहे. त्या गाडीला तीन चाकं आहेत. त्यानंतर ती व्यक्ती हँडल पकडून खेचतो आणि आराम करीत आहे. गाडीच्या वरच्या बाजूची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये आपल्याला पुढे, ती व्यक्ती त्या बाईकला पाण्यात बोट सारखी फिरवत आहे. पाण्यातून ती बाईक बाहेर आल्यानंतर चालू लागते. त्या व्यक्तीचा हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे.

हे सुद्धा वाचा

भारताच्या काही शहरात दिसू शकते

तो जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्यक्तीची जितकी तारिफ केली जाईल, तितकी कमी आहे. 16 जून तो व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला ३ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. लोकं त्या व्हिडीओ अधिक कमेंट करीत आहेत. एका व्यक्तीने लिहीलं आहे की, चायना कंपनीचे लोकं आमच्यापेक्षा जास्त जुगाडवाले असतात. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, मान्सूनच्या सीजनमध्ये ही बाईक भारताच्या काही शहरात दिसू शकते. या व्हिडीओच्या बाबतीतं आपलं काय मत आहे ? आम्हाला कमेंट करुन सांगा.