VIDEO | युपीमधील ड्रायव्हरचा जुगाड पाहून सुध्दा…, बसच्या गिअरची दोरी प्रवाशाच्या हातात

| Updated on: Jun 10, 2023 | 12:42 PM

युपीतील एक व्हिडीओ सध्या चांगलाचं चर्चेत आहे, त्यामध्ये बस चालकाने एक जुगाड केला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा त्यावर विचार करणार एवढं मात्र नक्की.

VIDEO | युपीमधील ड्रायव्हरचा जुगाड पाहून सुध्दा..., बसच्या गिअरची दोरी प्रवाशाच्या हातात
TRENDING VIDEO IN MARATHI
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्याचा अंदाज सुध्दा कोणी लावू शकत नाही. कधी एखादी व्यक्ती कारला हेलिकॉप्टर बनवतं आहे. तर कधी एखादी विविध गोष्टींपासून कूलर तयार करीत आहेत. सध्या एक अशाचं पद्धतीचा जुगाड व्हिडीओ (Jugaad Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ युपीच्या रोडवेजमधील बसचा आहे. त्यामध्ये बसच्या चालकाने जुगाड केला आहे. तो जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा त्यावर नक्की विचार करणार, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल (TRENDING VIDEO IN MARATHI) झाला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ (UP VIRAL VIDEO) सगळीकडं चर्चा देखील आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेल्या बातम्यांनूसार, हा व्हिडीओ उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव येथील आहे. त्यामध्ये रोडवरील बसमधील चालकाचा जुगाड पाहून लोकांनी डोक्याला हात लावला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चालकाने जुगाड केला आहे. चालकाने गिअरला दोरी बांधली आहे. त्याचबरोबर ती दोरी मागे बसलेल्या प्रवाशाच्या हातात दिली आहे. मागे बसलेला व्यक्ती घोडा गाडीत बसल्यासारखा वाटतं आहे. तो प्रवासी फार गंभीर चेहरा करुन बसला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हे सुद्धा वाचा

त्या व्हिडीओला ट्विटरवरती @GaurangBhardwa1 नावाच्या अकाऊंटवरुन ९ जूनला शेअर करण्यात आलं आहे. त्या व्हिडीओला कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, गाडीचा गिअर प्रवाशाने पकडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे, लोकांनी व्हिडीओला मजेशीर कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, बस चालवत आहे, ही मोठी गोष्ट आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘रोहित शेट्टीने या बस ड्रायव्हरकडून शिकावे,’ जेणेकरून तो त्याच्या पुढील चित्रपटात असे स्टंट करू शकेल.’ या व्हिडिओबद्दल तुमचं काय आहे ? आम्हाला कमेंट करून सांगा.