मोठ्या मोठ्या शहरातील मॉलचं कल्चर काही वेगळंच असतं. शहरांमधील लोक अनेक वर्षांपासून मॉल पाहत आहेत. काही लोक तर सुट्टीचा संपूर्ण दिवस मॉलमध्ये फिरण्यातच घालवतात. तुम्हीही कधी ना कधी मॉलमध्ये गेला असाल. या मॉलमध्ये काही काही भाग बंद असलेले दिसतात. काही मॉलमध्ये एखाद्या भागातील काम अर्धवट राहिलेलं दिसतं. या बंद असलेल्या भागात लोकांनी जाऊ नये म्हणून तिथे बॅरिकेड्स लावलेले असतात. पण काही लोकांना मात्र या ठिकाणी जायची भलतीच खुमखुमी असते. बंद असलेल्या ठिकाणी काय आहे? याचा शोध घेण्याची त्यांची धडपड असते. मना करूनही हे लोक अशा ठिकाणी कसे तरी जातातच. दोन लोकांनीही हा अगाऊपणा केला. त्यानंतर काय घडलं ते तुम्ही वाचाच.
नुकतंच दोन लोकांनी एका मॉलच्या बंद खोलीत प्रवेश केला. एक व्यक्ती त्याच्या कॅमेरामनसोबत मॉलमध्ये फिरायला आला होता. त्या मॉलचा एक भाग बंद होता. या बंद ठिकाणी काय आहे हे जाणून घ्यायची त्याला उत्सुकता लागली होती. त्यामुळे तो आत घुसला आणि थेट दुसऱ्या जगातच पोहोचला.
इंस्टाग्राम अकाउंट @rotting.midwest हे ए्क अर्बन एक्सप्लोरर अकाऊंट आहे. शहरातील बंद पडलेल्या जागा, निर्मनुष्य ठिकाणे, बंद पडलेल्या इमारतीत जाऊन तिथे काय आहे हे शोधणारे हे लोक आहेत. त्या ठिकाणचं रहस्य शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या ठिकाणी जाऊन तिथे नेमकं काय आहे हे ते जगाला दाखवत असतात. त्यानुसार हा तरुण एका मोठ्या मॉलमध्ये गेला आणि त्याला जे दिसलं ते वेगळंच होतं. खरंतर हा व्हिडीओ गेल्यावर्षीचा आहे. पण त्याची लोकप्रियता आणि मागणी इतकी होती की नेटकऱ्यांच्या आग्रहास्तव त्याला पुन्हा इन्स्टावर पोस्ट करावा लागला. त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या मॉलमधील एक भाग बंद होता. त्या ठिकाणी हा व्यक्ती घुसला. आत गेल्यावर बेसमेंटमध्ये जाण्यासाठी त्याला सिक्रेट बेसमेंट दिसलं. शिड्यांनी उतरल्यावर त्याला एक दरवाजा दिसला. दरवाजा उघडताच त्याला समोर एक मोठा हॉल दिसला. तिथेच एका भिंतीला एक मोठा खड्डा पडलेला होता. तो त्यात घुसून आत गेला. आत गेल्यावर त्याला एक टनल दिसलं. टनल एवढं मोठं होतं की ते संपता संपत नव्हतं. या टनलच्या कोपऱ्यात त्याला काही ऑफिस दिसले. त्यात कंप्युटर, टेलिफोन आदी साहित्य पडलेलं होतं. हा संपूर्ण परिसर भूलभुलैय्या सारखा होता. तो यातून कसा बाहेर आला हेच त्याला माहीत नाही.
गेल्या वर्षी त्याने हा व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हा त्याला पाच कोटी व्ह्यूज मिळाले होते. आता परत त्याने हा व्हिडीओ टाकल्यावर त्याला 80 लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट केल्या आहेत. एकाने तर ही व्यक्ती बाहेर आलीच कशी? असा सवाल केला आहे. तर दुसऱ्याने ती रहस्यमय जागा नाही, मॉलची इन्फ्रास्ट्रक्चरची जागा असल्याचं म्हटलंय.