नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : भारत यंदाच्या जी-20 संमेलनाचं यजमानपद भुषवित आहे. या भव्य संमेलनासाठी 20 सदस्य देशांसहीत 40 देशांचे नेते आणि प्रतिनिधी दिल्लीत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील या संमेलनात उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या खास ‘द बीस्ट’ या चिलखती बुलेट प्रुफ, बॉम्ब प्रुफ सर्व प्रकारच्या रासायनिक हल्ल्यापासून सुरक्षित असलेली त्यांच्या कारमधून बायडन प्रवास करणार आहेत. या कारची काय आहेत नेमकी वैशिष्ट्ये पाहूयात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अधिकृत कार अनेक प्रकारच्या बॉम्ब हल्ले आणि रासायनिक हल्ल्यांपासून सुरक्षित आहे. अमेरिकेची प्रमुख कार निर्माण कंपनी जनरल मोटर्सच्या कॅडिलॅक मोटर कार डीव्हीजनने तयार केली आहे. या कारला मिलट्री-ग्रेड कवच, बुलेट प्रुफ खिडक्या आणि अश्रुधूर गॅस डिस्पेन्सरचा समावेश आहे. या कारचे कवच एल्युमिनियम, सिरॅमिक आणि स्टीलपासून तयार केले आहे. रासायनिक हल्ला झाला तरी ही कार सक्षम आहे. या कारमध्ये रासायनिक आणि जैविक हल्ल्यावेळी स्वत:ची ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था आहे.
या कारच्या दरवाज्यासाठी पाच इंच जाडीचा तर पाठच्या दरवाज्याला आठ इंच धातूचा वापर केला आहे. यात काच आणि पॉलिकार्बोनेटचा वापर केला आहे. ज्यामुळे बॉम्ब हल्ल्यातही आतील व्यक्ती सुरक्षित रहाते. यात अश्रुधुर गॅस डिस्पेन्सर, शॉटगन, स्मोक स्क्रीन आणि राष्ट्रपतीच्या रक्तगटाच्या दोन पिशव्या, संचार उपकरणे, जीपीएस यंत्रणा आणि नाईट व्हीजनचा समावेश आहे.
द बीस्ट कारमध्ये सात व्यक्ती बसू शकतात. या कारमध्ये अनेक संरक्षक सुविधा आहे. जी अन्य कारमध्ये नाहीत. या कारचे वजन आठ टन इतके आहे. या कारचे नवे मॉडेल साल 2018 मध्ये आले. या कारची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. द बीस्ट ही कार सर्वात आधी साल 2001 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश यांच्या कार्यकाळात तयार झाली. नंतर तिच्यात वेळोवेळी अनेक बदल केले.
– ही कार 15 सेंकदात 0 ते 100 किमी प्रति तासांचा वेग पकडते
– 5 इंच जाडीचे विंडो ग्लास पॉइंट 44 मॅग्नम बुलेटला रोखण्यास सक्षम
– 8 ते 10 टन कारचे वजन
– हल्लेखोरापासून वाचण्यासाठी वीजेचा झटक्यांसह अनेक उपाय
– बायडन यांच्या कारला 46 नंबर दिला आहे, ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आहेत.