सुरत | 15 सप्टेंबर 2023 : पाणीपुरीचे नाव जरी काढले तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी किंवा गोलगप्पे नावाने ओळखले जाणारे हे स्ट्रीटफूड प्रचंड प्रसिद्ध आहे. चटपटीत पाणीपुरी खाण्यासाठी खवय्ये ती विकणाऱ्या भय्यांवर विश्वास ठेवून तिला संपवितात. तरीही विक्रेत्यांनी पाणीपुरी बनविताना हातात हॅण्डग्लोज घातले आहेत. पाणीपुरीसाठी स्वच्छ पाणी वापरले आहे का ? या चिंता पट्टीच्या खवय्यांना पडत असतात. परंतू पाणीपुरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहून हीच जगातील सर्वात स्वच्छ पाणीपुरी अशी प्रतिक्रीया युजर व्यक्त करीत आहेत.
एका फूड व्लॉगरने पाणीपुरी निर्मितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गुजरातच्या सुरत येथील कारखान्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका स्वयंचलित मशिनीत पीठ मळून त्याच्या गोल पुऱ्या कापल्या जातात. त्यानंतर या पुऱ्या मोठ्या फ्रायरमध्ये तळल्या जाऊन त्यांना चाळणीत तेल गाळून कोरडे केले जाते. त्यानंतर या पाणीपुरी पॅकेटमध्ये पॅक केल्या जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मानवी स्पर्श कुठेही दिसत नाही. त्यामुळे या व्हिडीओला शेअर करणाऱ्याने सर्वात स्वच्छ पाणीपुरी अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
most hygienic panipuri video watch here –
पाणीपुरीच्या या व्हायरल क्लिपला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. या पाणीपुरीच्या व्हिडीओत संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार झालेल्या व्हिडीओतील स्वच्छतेची प्रशंसा केली जात आहे. अनेक युजरनी ही संपूर्ण देशातील एकमात्र स्वच्छ पाणीपुरी आहे म्हटले आहे. एका युजरने दावा केला आहे की, भारताची एकमेव खाण्यायोग्य पाणीपुरी. तर एका युजरने तिला, सर्वात स्वच्छ पाणीपुरी म्हटले आहे. तर अनेक युजरने हीची चव कदाचित भारतीय लोकांना आवडणार नाही. कारण त्यांना त्यांची नेहमीची अस्वच्छ पाणी खाण्याची सवय लागली आहे. तर एका युजरने म्हटले की, ‘असली स्वाद तर घाम आणि अस्वच्छतेमुळे येतो’. तर एका युजरने म्हटले की, ‘भारतीयांना ही पाणीपुरी आवडणार नाही.’