मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) दिल्लीचा पंजाबी मुलगा आहे. विराट कोहलीला तुम्ही अनेक वेगळ्या अवतारात पाहिलं आहे. त्याचबरोबर विराट कोहलीची स्टाईल त्याच्या चाहत्यांना अधिक आवडते. तु्म्हाला सध्या विराट कोहलीचा राजस्थानी अवतार (Rural Rajasthani avatar) पाहायला मिळणार आहे. हा अवतार सुध्दा लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. तशा पद्धतीच्या अनेक कमेंट विराट कोहलीच्या पोस्टरला आल्या आहेत. एका राजस्थानमधील कलाकाराने (Rajasthan) राजस्थानी लुकमध्ये विराट कोहलीची एक पेन्टींग तयार केली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. त्याचबरोबर तुम्ही हे पेन्टीग पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा कमेंट केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं मात्र निश्चित.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तेजू जांगिड़ यांनी हे पेन्टीग तयार केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लटफॉर्मवरती शेअर करण्यात आला आहे. तो स्वत:ला राजस्थानमधील जोधपूरचा कलाकार असल्याचं म्हटलं आहे. एका छोट्याशा व्हिडीओमध्ये तेजू याने राजस्थानमधील अवतारात विराट कोहली कशा पद्धतीने दिसू शकतो हे सांगितलं आहे. त्या पेन्टीगमध्ये विराट कोहली कुर्ता, चमकत असलेली लाल पगडी घातलेली आहे आणि त्याच्या हातात एक काठी घेऊन उभा आहे. त्या पेंटीगमध्ये अधिक लोकांना आर्कर्षित करीत आहे, ती म्हणजे त्याची लांबलचक मिशी.
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कॅप्शन ‘ “@ virat.kohli राजस्थानमधील ग्रामीण लुकमध्ये असं लिहीलं आहे.”
व्हिडीओ ऑनलाईन शेअर करण्यात आल्यानंतर आतापर्यंत दोन मिलियन लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना आवडल्यानंतर त्यांनी लाईक करुन शेअर केला आहे. त्याचबरोबर ज्या कलाकाराने ही पेन्टींग तयार केली आहे. त्याच देखील कौतुक करण्यात आलं आहे. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, तुम्ही खूप चांगले कलाकार आहात. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीले आहे की, खूप चांगलं…
विराट कोहलीच्या आतापर्यंत अनेक चांगल्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्याने एखादी स्टाईल जरी केली, तरी सुध्दा तो सोशल मीडियावर अधिक व्हायरल होतो.