मेट्रो आहे की मजा… अजून एक डान्स व्हिडीओ झाला व्हायरल ; तिचा डान्स पाहून…

| Updated on: Jun 19, 2023 | 2:15 PM

तरुणीच्या या डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ आत्तापर्यंत 35 लाख वेळा पाहिला होता तर हजारो लाईक्सही मिळाले आहेत.

मेट्रो आहे की मजा... अजून एक डान्स व्हिडीओ झाला व्हायरल ; तिचा डान्स पाहून...
Image Credit source: instagram
Follow us on

Dance Video : जेव्हापासून सोशल मीडियाचं (social media) प्रस्थ वाढलं आहे , तेव्हापासून लोक वेगळ्याच विश्वात गेले आहेत. रोज काही ना काही व्हायरल होत असते, जे पाहून लोक संतापतात. इंस्टाग्राम रील बनवण्याच्या प्रक्रियेत लोक काय-काय करत असतात, हे तुम्ही पाहिले असेलच. ते कुठेही नाचू लागतात आणि काहीजण अशी कृत्ये करू लागतात की ते पाहूनच राग येतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा डान्सचा आहे. यामध्ये एक मुलगी दिल्ली मेट्रोच्या (metro) आत नाचताना दिसत आहे आणि मेट्रोमध्ये बसलेले लोक तिचा ‘तमाशा’ पाहत आहेत.

दिल्ली मेट्रो गेल्या अेक महिन्यांपासून चर्चेत आहे. कधी कधी एखादी मुलगी मेट्रोच्या आत नाचू लागते, तर काही जोडपी अश्लील कृत्ये करताना दिसतात. असेच काहीसे या व्हिडिओतही पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गुंडे चित्रपटातील एक गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे आणि त्यावर मुलगी नृत्य करताना दिसत आहे.

त्याचवेळी मेट्रोमध्ये बसलेले सर्व लोक तिला पाहण्यात मग्न होते. अचानक सुरू झालेला हा डान्स पाहून तिच्या शेजारच्या काकांना धक्काच बसला आणि ते थोडेसे अस्वस्थही झाले. त्या मुलीचे हे उद्योग पाहून ते हैराण झाले होते.

 

तरुणीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sachkadwahai नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला तर हजारो लाईक्सही मिळाले आहेत. आतापर्यंत 3.5 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे, तर 58 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अनेक लोक यावर विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

भारतात कोणता नवा व्हायरस आला आहे, असा प्रश्न या काकांना पडला आहे, अशी मजेशीर कमेंट एका काकांनी केली आहे. तर एक युजर अतिशय भडकला असून ऑनलाइन चप्पल मारण्याचे एखादे ॲप आहे का, असा संतप्त सवालच त्याने विचारला आहे. एवढेच नव्हे तर, या मुलीचा असा डान्स आणि हे कृत्य पाहून, ते काका पुन्हा कधीही मेट्रोने प्रवास करतील की नाही शंकाच आहे, अशी कमेंटही एका युजरने केली आहे.