VIDEO : वाघ तो वाघच, त्याने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला आणि जे घडले ते भयंकर…

| Updated on: May 07, 2023 | 12:49 PM

तुम्ही वाघाला पाहायला गेलात जरी तो पिंजऱ्यात असला तरी त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखा. कारण भलते धाडस करायला गेलात तर तुमची काही धडगत नाही, याचा धडा या व्हिडीओतून मिळेल.

VIDEO : वाघ तो वाघच, त्याने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला आणि जे घडले ते भयंकर...
tiger
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : तुम्ही व्याघ्र प्रकल्पात पिंजऱ्यात बंदीस्त असणाऱ्या वाघांना पाहून त्यांना कमजोर समजू नका. कारण वाघ हा हिंस्र प्राणी असल्याने त्याला पिंजऱ्यात ठेवले म्हणून हलक्यात घेऊ नका. वाघाला जगातला सर्वात खतरनाक शिकारी म्हटले जाते. तो आपल्या सावजाला क्षणात नेस्तानाबूत करू शकतो. असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यात एक जण बंद पिजऱ्यातील वाघाला गोंजारायला जातो आणि जे घडते ते पाहून तुमचा थरकाप होईल…

वाघ जरी पिंजऱ्यात बंद असला तरी त्याला कमजोर समजण्याचा प्रयत्न कदापी करू नये. कारण तो पिंजऱ्यात बंदीस्त असला तरी तो खतरनाकच असतो. याची कल्पना सोशल मिडीयावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येऊ शकेल. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या वाघाला पाहून त्याला गोंजारायला जातो. पिंजऱ्यातील तारांमधून हा व्यक्ती हात घालून वाघाला स्पर्श करायला जाताच वाघ चपळाई त्या व्यक्तीचा पंजाच आपल्या जबड्यात ओढतो आणि जीवाच्या आकांताने तो व्यक्ती किंचाळतो.

हा पाहा व्हिडीओ…

 

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ earth.reel नावाच्या अकाऊंटवरुन याच वर्षी 28 एप्रिल महिन्यात शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाहून युजर वेगवेगळ्या प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत. अनेकांनी आपला राग आणि चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक हजाराहून अधिक व्यक्तींनी लाईक केले आहे.