viral video : आजकल वयात आलेले तरूण आणि तरूणी परफेक्ट लाईफ पार्टनरच्या शोधासाठी डेटींग साईट, मॅट्रीमोनियल साईट किंवा सोशल मिडीयावर दिवसरात्र पडीक असतात. किंवा कंटाळून थेट आई – वडीलांना सांगतात आम्हाला मुलगी किंवा मुलगा शोधा आता. त्यामुळे मग दर रविवारी वघूवर सूचक मंडळाच्या मेळाव्यांना हजेरी लावायला ते मोकळे होत असतात. परंतू आपल्या देशात असे एक ठिकाण आहे जेथे आपल्याला ऑफलाईन आपला जीवनसाथी निवडता येतो. अशा अजब ठीकाणाची माहीती हवी तर ही बातमी वाचा…
मार खा मगच लग्न ठरेल
राजस्थानचे जोधपूर आपल्या अनेक परंपरांमुळे ओळखले जाते. येथील पारंपारिक पोशाख, सुग्रास जेवण आणि सणांची मांदीयाळी तुम्हाला खिळवून ठेवेल. जोधपूरला दरवर्षी आयोजित होणारे मरू, थार किंवा तीज महोत्सव सर्वांना परिचित असेल. परंतू आज आपण अशा मेळाव्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्यामुळे सिंगल मंडळी जामच खूश होतील.
पाच दिवसांपूर्वी जोधपूरच्या ‘बेंतमार मेला’ नावाने एक व्हिडीओ शेअर होत आहे. jodhpur_the_blue_heaven नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच या व्हिडीओला कमेंटही मजेदार आल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने म्हटले आहे, खूप मजा येते या जत्रेत. तर दुसऱ्या एका युजरे म्हटले आहे की जर मी येथे गेलो तर माझे पुन्हा लग्न होईल, तर एका युजरने म्हटले की, ‘ पोपटलालला येथे अवश्य पाठविले पाहिजे. तर बाकीचे लोक काय मजेशीर कमेंट करत आहेत ते पाहा..
जत्रे परंपरेमागे ही आहे धारणा
जोधपूर शहरात गणगौर पूजनानंतर अनेक जत्रांना प्रारंभ होतो. गणगौर पूजनानंतर सहा दिवसांनी धींगा गवरचा बेंतमार ( लठ ) मेळा भरतो. या यात्रेत रात्रीच्या वेळी रस्त्यावर महिलांचे राज्य असते. या दिवशी महिला नटून थटून हातात वेताची लाठी घेऊन उभ्या असतात. कोणताही तरूण किंवा पुरूष दिसताच त्या हातातील काठीने त्यांना मारतात. या मागे अशी मान्यता आहे की जर लग्न झालेल्या पुरूषाला कोणत्या महिलेचा लाठीचा प्रसाद मिळाला तर त्याचे लवकरच लग्न ठरते. या यात्रेत कोणताही पुरूष महिलांचा मार खाऊन नाराज होत नाही. भले ती महिला ओळखीची असो की नसो आहे की नाही गंमत. तर मग सिंगल लोकांनी आता पुढच्यावर्षी या जत्रेला जायला हवे की नाही !