मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) काही गोष्टी शेअर होतात, त्यापैकी काही गोष्टी आवडीच्या असतात असं अनेकदा दिसून आलं आहे. ज्यावेळी लोकांना आवडणारी एखादी गोष्ट व्हिडीओत (Viral Video) असते. त्यावेळी लोकं त्या व्हिडीओला पुन्हा-पुन्हा पाहतात. त्याचबरोबर कमेंट देखील करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुणी सायकल चालवताना दोरी उड्या घेत आहे. विशेष म्हणजे तरुणी सायकलचा (Cycle) हॅडलसोडून दोरी उड्या मारत आहे.
@iamsecretgirl023 या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ साठ हजार लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. त्याचबरोबर लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडल्याने पु्न्हा-पुन्हा त्यांनी पाहिला आहे.
त्या व्हिडीओच्या खाली वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत. त्यापैकी काही कमेंट चांगल्या आहेत. त्याचबरोबर लोकांनी तरुणीला सल्ला देखील दिला आहे.
हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु दोन्ही हात सोडून रशी उड्या मारल्यामुळे तरुणी चर्चेत आली आहे.