मुंबई : नुकतंच नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला आहे. अनेकांना या परीक्षेत यश मिळाले. तर काहीजण अयशस्वी ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय नागरी सेवेच्या परीक्षा किती अवघड असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. दिवसरात्र मेहनत करुनही अनेकांना या परीक्षेत यश मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आएएस अधिकारी Awanish Sharan यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे ?
सर्वांना क्लास वन अधिकारी व्हायला आवडतं. ही इच्छा मनात बाळगून अनेकजण अभ्यासाला लागतात. ही परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी अनेकजण जीवाचं रान करतात. दिवसरात्र मेहनत करतात. त्यानांच उद्देशून आयएएस Awanish Sharan यांनी एक मजेदार व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस पुस्तकासोबत दिसतोय. तो पुस्ताकाला सोबत घेऊनच सगळे काम करतोय. कोणतंही काम करायचं असेल तरी तो पुस्तकाला बाजूला ठेवत नाहीये. या त्याच्या पुस्तकाच्या वेडापायी तो अनेकदा पडतोसुद्धा. मात्र, तरीही तो पुस्तकाला सोडत नाहीये.
An ideal Civil Services Aspirant. ? pic.twitter.com/0jsw3UJElK
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 25, 2021
हा व्हिडीओ शेअर करताता आयएएस अधिकारी Awanish Sharan यांनी समर्पक आणि मजेदार असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनचीसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘युपीएससीची तयारी करणारा आयडीयल विद्यार्थी’ असं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
दरम्यान Awanish Sharan यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे. अनेकजण या व्हिडीओला रिट्विट करुन मजेदार कमेंट करत आहे. आतार्यंत या व्हिडीओला 34 हजार लोकांनी पाहिलं आहे.
इतर बातम्या :
डोंगरावर दडलंय 18 किलो सोनं; फक्त कविता वाचून शोधायचं, सापडेल का?