Video : चिमुकल्याचा बाणेदारपणा पाहिलात का? तेजप्रताप यादवांना दिले असे उत्तर यूजर म्हणाले ‘दिवार’ आठवला

| Updated on: May 18, 2022 | 1:32 PM

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने राजद नेते तेज प्रताप यांच्याशी संवाद साधला आहे.

Video : चिमुकल्याचा बाणेदारपणा पाहिलात का? तेजप्रताप यादवांना दिले असे उत्तर यूजर म्हणाले दिवार आठवला
Follow us on

चित्रपट निर्माता विनोद कापरी (Vinod Kapri) यांनी नुकताच एक व्हिडीओ (Video) ट्विट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स या व्हिडीओमधील मुलाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना विनोद कापरी यांनी या व्हिडीओला एक समर्पक असे कॅप्शन देखील दिले आहे. ” कमाल का बच्चा है ये खुद्दारी, ईमानदारी कूट कूट कर भरी है|” असं कॅप्शन कापरी यांनी व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याचे आणि राजदचे नेते तेजप्रताप यादव यांचे संभाषण आहे. हा मुलगा तेजप्रताप यादव यांना आपला प्रवेश एखाद्या चांगल्या शाळेत करू द्या अशी विनंती करत आहे. तेव्हा तेजप्रताप यादव त्याला विचारत आहेत, की तुला मोठेपणी काय व्हायचे आहे? डॉक्टर व्हायचे आहे की इंजिनियर तेव्हा हा मुलगा आपल्याला मोठेपणी आएएस अधिकारी व्हायचं आहे, असे तेजप्रताप यांदव यांना सांगतो. तसेच आपण कोणच्याही अंडर काम करणार नसल्याचे देखील त्यांने म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतात राजदचे नेते तेजप्रताप हे एका चिमुकल्याशी संवाद साधत आहेत. त्याचे नाव सोनू आहे. सोनू हा तेजप्रताप यादव यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत आहे. याचदरम्यान सोनू आपला प्रवेश एखाद्या चांगल्या शाळेत करून द्यावा अशी विनंती तो तेजप्रताप यादव यांना करतो. तेव्हा तेजप्रताप यादव हे त्याची विनंती मान्य करतात. ते त्याला सांगतात की मी तुझा प्रवेश चांगल्या शाळेत करून देतो. तुला भविष्यात काय बनायचे आहे. इंजिनियर की डॉक्टर तेव्हा तो मुलगा न भीता उत्तर देतो मला आयएएस ऑफीसर बनायचे आहे. तेव्हा तेजप्रताप यादव म्हणतात की ठीक आहे, तू आयएएस ऑफीसर हो आणि जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा आमच्या अंडरखाली काम कर. तेव्हा या मुलाने दिलेले उत्तर त्याचा बाणेदारपणा दाखवणारे होते. त्यांने तेजप्रताप यांना सांगितले की मी कोणच्याही अंडरखाली काम करणार नाही, मी देशासाठी काम करेल.

हे सुद्धा वाचा

 

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करत विनोद कापरी यांनी म्हटले आहे की, हा मुलगा खूपच कमाल आहे. स्वाभिमानी आणि ईमानदार आहे. या मुलाचे उत्तर ऐकूण मला अमिताभ बच्चन यांच्या दिवार चित्रपटाची आठवण झाली. असं कापरी यांनी म्हटले आहे. दरम्यान सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. युजर या मुलाचे कौतुक करत आहेत.