विचित्र हेलमेट घालून परिक्षेला पोहचले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, कारण वाचून हैराण व्हाल !

| Updated on: Oct 24, 2022 | 3:06 PM

हा हटके व्हिडिओ पाहिल्यानंतर हे विद्यार्थी नेमके आहेत तरी कुठले असा प्रश्न अनेकांना पडत आहे त्यामुळे लोक गुगलवर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सर्च करीत आहे.

विचित्र हेलमेट घालून परिक्षेला पोहचले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, कारण वाचून हैराण व्हाल !
विचित्र हेलमेट घालून परिक्षेला पोहचले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी
Image Credit source: social media
Follow us on

सोशल मीडिया बरेच व्हिडिओ वायरल होत असतात त्यातील अनेक व्हिडिओंमध्ये प्राण्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात, तर कित्येक व्हिडिओंचा माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलेले असतात. हल्ली तर कोणाला सार्वजनिक ठिकाणी काही हटके दिसलं तरी त्याचा व्हिडिओ बनवला जातो आणि तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Video Viral) होतो. इतकच नव्हे तर काही चित्र विचित्र अॅक्टिव्हिटीचे व्हिडिओ (Activity Video) देखील मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरतात. असाच एक व्हिडिओ त्यातील चित्रविचित्र कंटेंटमुळे (Content) भलताच चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडिओमध्ये वर्गात विद्यार्थी परीक्षा देतायेत त्यावेळी त्यांनी चित्रविचित्र स्वरूपाची हेल्मेट घातलेली आहे. ही मुले कुठच्या रस्त्यावर गाड्या चालवत नाहीये किंवा कुठे मारहाणीच्या ठिकाणी उभी नाहीत, तरीही यांनी हेल्मेट का घातले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागील कारण जाणून घेण्यासाठी अनेक जण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.

व्हिडिओ नेमका कुठचा आहे?

हा हटके व्हिडिओ पाहिल्यानंतर हे विद्यार्थी नेमके आहेत तरी कुठले असा प्रश्न अनेकांना पडत आहे त्यामुळे लोक गुगलवर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सर्च करीत आहे. हा व्हिडिओ फिलिपआईन्समधून वायरल झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रसारित झालेल्या बातमीनुसार, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर घातलेली चित्र विचित्र हेल्मेट्स हे कागद आणि खराब वस्तूंपासून बनवण्यात आली आहे. त्यामुळे हेल्मेट चित्र विचित्र असतील तरी विद्यार्थ्यांनी याची निर्मिती करण्यासाठी केलेला टाकाऊ वस्तूंचा वापर कौतुकास पात्र ठरला आहे.

सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे हेल्मेट बनवले आहे हेल्मेटची डिझाईन सर्वांचीच वाहवा मिळवत आहे.

अँटी चॅटिंग हॅट बनवली!

कॉलेज विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये वापरलेले हेल्मेट हे अँटी चॅटिंग असल्याचे समोर आले आहे. बायकल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधील हा व्हिडिओ आहे. यातील विद्यार्थी इंजीनियरिंगचे स्टुडंट्स आहेत. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, म्हणून अशा प्रकारचे हेल्मेट घालण्याच्या सूचना परीक्षा विभागाने दिल्या होत्या.

त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर चित्र विचित्र हेल्मेट्स घातली होती. परीक्षेतील कॉफीचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा प्रशासनाने केलेला हा उपाय चांगला चर्चेत आला आहे.