सोशल मीडियावर अनेक लोकांचे जीव धोक्यात घालून स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक इसम आपल्या खांद्यावर बाईक घेऊन रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना दिसत आहे. या व्हिडीओला लोक शेअर करीत असून त्यास मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत. या इसमाच्या या जीव धोक्यात घालून बाईक खांद्यावर उचलण्याच्या कृतीवरुन मजेशीर प्रतिक्रीया व्हिडीओ मिळत आहेत. लोक या तरुणावर टीका देखील करीत आहेत.
व्हिडीओत एक इसम रेल्वे बंद रेल्वे फाटकातून आपली वजनी मोटरसायकल खांद्यावर उचलून रेल्वे रुळ बिनधास्त ओलांडताना दिसत आहे. कोणाच्या मदतीशिवाय ही वजनी बाईक त्याने खांद्यावर घेतल्याने लोक त्याच्या हिंमतीचे कौतूक करीत आहेत. परंतू त्याच्यावर टीका देखील होत आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
A guy Lifted his bike on his shoulders to Cross the Railway barrier: pic.twitter.com/ki4dx5BmZZ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 6, 2025
अवघ्या १८ सेकंदाच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहे. व्हिडीओत दिसत आहे की रेल्वे फाटकांच्या दोन्ही बाजूला लोक फाटक उघडण्याची वाट पाहात आपआपल्या वाहनात दिसत आहेत. परंतू या फाटकाच्या उघडण्याची वाट न पाहाता एक तरुण बाहुबलीच्या प्रभासने जसे शंकराची पिंढ जशी खांद्यावर उचलली तशी त्याने आपली बाईक खांद्यावर उचलून रेल्वे फाटक ओलांडत आहे.त्याला ही बाईक उचलण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज न लागल्याने लोक या तरुणाच्या हिंमतीची दादही देत आहेत आणि त्याच्यावर टीका देखील करीत आहेत. बातमी लिहीली जाईपर्यंत या व्हिडीओला साडे पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहीली आहे.हा व्हिडीओ Ghar Ka Kalesh नावाच्या युजरने शेअर केले आहे.
व्हिडीओ कॅप्शन दिली आहे की भारतातील रेल्वे क्रॉसिंगवर एक आणखी दिवस,तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की हा इसम कशाप्रकारे रेल्वे ट्रॅक ओलांडत आहे.व्हिडीओवर Radhe नावाच्या युजरने लिहीलेय की ही देशी घीची शक्ती आहे. तर एका युजरने लिहीलेय की भारतात सेफ्टी फर्स्ट नाहीत तर सेफ्टी थर्ड आहे.
अन्य युजरने लिहीलंय की हा तर बाहुबली आहे.आता भारतात ब्रिज बनविण्याची कोणतीही गरज नाही.एका युजरने म्हटलेय की पण असे करायची गरजच काय आहे ? एका युजरने लिहीलेय की हा इसम जॉन अब्राहम याचा दूरचा नातेवाईक आहे वाटतं?