लखनऊ : तुम्ही ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, अनेकांचा अशा अपघातात प्राण गमवावे लागतात. काही जण वाचले तरी कायमचे अपंग होतात. तरीही प्रवासी त्यातून काहीच धडा घेत नाहीत. सोशल मिडीयावर आता एक व्हिडीओ फिरत आहे. त्यात तुम्हाला एक तरुण वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून कोसळल्याने किंवा चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात त्याची काय अवस्था झाली आणि शेवटी काय झाले हे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर होत असून या व्हिडीओत एक ट्रेन प्रचंड वेगाने स्थानकातून नॉन स्टॉप आहे. व्हिडीओत आपण पाहू शकता की वेगाने जाणाऱ्या या ट्रेनला पाहून प्रवासी बाजूला होताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक एक तरूण ट्रेनमधून अचानक पडताना दिसत आहे. या ट्रेनच्या प्रचंड वेगाने हा तरूण फलाटावरून अक्षरश: फरफरटत जाताना दिसत आहे. त्याला घसरत जाताना पाहून काळजाचा थरकाप होतो. तो घसरत अक्षरश: शंभर मीटरपर्यंत जाताना दिसत आहे. यानंतर आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही पण हा तरुण पुन्हा टुणकण उभा राहताना दिसत आहे. म्हणजे एवढ्या वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून पडणारा कोणी वाचेल असे वाटत नाही.
येथे पहा व्हिडीओ…
*यूपी के शाहजहांपुर में 110 की स्पीड में एक्सप्रेस ट्रेन से गिरा युवक,
100 मीटर तक प्लेट फॉर्म पर फिसलता चला गया और फिर खडा हो गया*
????????? pic.twitter.com/6eQmCeSaf9
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) June 20, 2023
या व्हिडीओला ट्वीटरवर शेअर केल्यानंतर जवळपास 57 हजार वेळा पाहीले गेले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना युजरने म्हटले आहे की या तरुणाचे नशीब चांगले आहे की तो ट्रेनखाली आला नाही. एका युजरने म्हटले आहे की लकी बॉय, जर तो प्लॅटफॉर्मवर न कोसळता जर गाडी खाली आला असता तर त्याची वाईट अवस्था झाली असती. तर एकाने म्हटले की हा स्पायडर मॅन निघाला. तर एकाने म्हटले की अशाच एका अपघातात एकाचे दोन तुकडे झाले होते. ट्वीटरवर शेअर करणाऱ्या या धक्कादायक व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे की युपीच्या शाहजहापूर मधील 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून एक युवक पडला आणि फलाटावर घसरत गेला आणि पुन्हा उभा राहीला.