VIDEO : अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने बनविली अशी बॉडी, पाहून व्हाल हैराण

| Updated on: Apr 13, 2023 | 8:06 PM

लहान वयात व्यायामाची आवड लागलेल्या 12 वर्षीय नेटोला पाहून तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल, वडीलांसोबत व्यायामशाळेत गेला असताना त्याला व्यायामाची आवड लागली.

VIDEO : अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने बनविली अशी बॉडी, पाहून व्हाल हैराण
NETO
Image Credit source: socialmedia
Follow us on

VIRAL VIDEO : आजकल सर्वजण चांगली बॉडी बनविण्यासाठी जिममध्ये घाम गाळत असतात. विविध आहार आणि प्रोटीन खाण्यावर भर देत असतात. परंतू एका अवघ्या 12 वर्षीय मुलाने मोठ्या माणसासारखी कसरत करीत आपली मसल बॉडी बनविली आहे. त्याच्या व्हिडीओला सोशल मिडीयावर खूपच लाईक केले जात आहे. हा मुलगा जिममध्ये मोठ्या माणसांना टक्कर देत आहे. ब्राझील या 12 वर्षीय मुलाचे व्यायामावरील हे प्रेम मोठ्यांच्या डोळ्यातही अंजन घालण्यासारखे आहे.

ब्राझीलच्या 12 वर्षीय कॉजिन्हो नेटो (Cauzinho Neto) या मुलाने सोशल मिडीयावर तहलका माजवला आहे. सोशल मिडीयावर त्याने व्यायाम करतानाचे पोज देणारे व्हिडीओ शेअर केले आहे. या छोट्या मुलाच्या एवढ्या कमी वयातील मसल आणि अ‍ॅब्ज पाहून आपणही आश्चर्यचकीत व्हाल. हा मुलगा वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ पाहून मोठ्यांनाही व्यायाम करण्याची आणि त्याच्या प्रमाणे आपली बॉडी बनविण्याची नक्की इच्छा होईल.

नेटो हा ब्राझीलच्या साल्वाडोरचा रहिवासी आहे. त्याची दिनचर्या रोज सकाळी साडे पाच वाजता सुरू होते. तो रोज सकाळी पाच किलोमीटर धावत असतो. त्यानंतर सिट अप्स मारून शाळेत जातो. शाळेतून आल्यावर थोडा आराम आणि होमवर्क करतो. त्यानंतर झोपण्यापूर्वी तो पुन्हा आपला दुसरा वर्कआऊट सुरू करतो. संध्याकाळी त्याचा व्यायाम दोन ते अडीच तासांचा असतो.

 

 

बातम्यांनूसार 12 वर्षीय नेटो 91 किलोग्रॅम पेक्षा अधिक वजनासह डेडलिफ्ट करतो. ते त्याच्या वजना पेक्षा तीनपट जास्त आहे. या मुला इंस्टाग्रामवर 2 लाख 69 लोक फॉलो करतात. यात तो डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, बेंचप्रेस आणि बायसेप्स कर्ल सारखे व्यायामाचे प्रकार करताना दिसतो. साल 2021 मध्ये नेटोला त्याचे वडील जिममध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर त्याला बॉडी बिल्डींगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. पंधरा दिवसात तो व्यायाम शिकला. वर्कआऊट सुरू करताच त्यांची एका वर्षांत उंची 13 सेंटीमीटरने वाढली. साल्वाडोरमधील वेटलिफ्टींग स्पर्धात भाग घेतला. त्याच्या ट्रेनिंग टीममध्ये एक कोच, डॉक्टर, फिजिओथेरेपिस्ट आणि न्यूट्रीशियन आहे.