सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर (Trans-Siberian Railway) -18 डिग्री सेल्सिअसच्या गोठवणाऱ्या थंडी(Extreme Cold Weather)त एक माणूस दारूच्या नशेत झोपला. दरम्यान, ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. मात्र, रेल्वेच्या धडकेने तो चमत्कारिकरित्या बचावला. तो माणूस रुळांच्या मधोमध पडला होता. यासंबंधी रशियाच्या सरकारनं एक व्हिडिओ(Video)ही जारी केला. आणि संबंधित माणूस कसा बचावला हेही सांगितलं. दरम्यान, त्या व्यक्तीला जखमा झाल्या असून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
रुळावर पडली
‘मिरर यूके’च्या वृत्तानुसार, हे प्रकरण रशियाच्या Krasnoyarsk शहरातील आहे, जिथे 36 वर्षीय व्यक्ती Krasnoyarsk-Abakan रेल्वे मार्गावर रुळांमध्ये पडलेल्या अधिकाऱ्यांना आढळून आली. समोरून येणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलं होतं, पण त्याला अचानक ट्रेन थांबवता आली नाही. अशा स्थितीत काही अंतर पुढे गेल्यावर ट्रेन थांबली तेव्हा त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक धावू लागले.
गृह मंत्रालयाने जारी केला व्हिडिओ
रुळावर पडलेल्या व्यक्तीला रेल्वेने धडक दिली असावी आणि त्याचा मृत्यू झाला असावा, अशी लोकांना खात्री होती. मात्र तो माणूस सुखरूप जिवंत होता. रशियाच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या माणसाला ट्रेनखाली कसे जिवंत वाचवले, ते दाखवले आहे.
जगातील सर्वात थंड क्षेत्र
ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण जगातील सर्वात थंड क्षेत्र आहे (सायबेरिया). तो माणूस सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर (ट्रान्स-सायबेरियन रेल्वे) पडला होता. ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर, क्रू मेंबर्सनी त्याला ब्लँकेट इत्यादींनी उब देण्याचा प्रयत्न केला, कारण त्या वेळी तापमान उणे 18 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.
अनेक जखमा मात्र गंभीर दुखापत नाही
रिपोर्टनुसार, हा माणूस जवळच्या रेल्वे स्टेशनवर त्याच्या मित्राला भेटायला आला होता. तेथे तो दारू प्यायला. नंतर गोठवणाऱ्या थंडीत तो रेल्वे ट्रॅकवर झोपला. तो जिथे झोपला तो भाग Krol आणि Dzhetka स्थानकांमधला आहे. त्या माणसाला नंतर कुरागिन्स्काया जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी सांगितले की त्या माणसाला अनेक जखमा झाल्या आहेत. मात्र, कोणतीही दुखापत गंभीर नसून तो धोक्याबाहेर आहे.