मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज नवे व्हिडीओ (Video Viral) पाहायला मिळतात, त्यामध्ये काही लोकांच्या अधिक पसंतीला पडतात असं पाहण्यात आलंय. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) नेहमी त्यांच्या चित्रपटातील कामामुळे चर्चेत असतो. परंतु त्याच्या सारखे दिसणारे भारतात अनेक तरुण आहेत. ते सध्या रिल्सच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सेम टू सेम अजय देवगण सारखा दिसणाऱ्या एका तरुणाने रिल्स केलं आहे. तो सेकंद भराचा व्हिडीओ चार मिलियन लोकांनी पाहिला आहे.
सध्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अजय देवगणचा 90 च्या दशकातील एक चित्रपट आहे. त्यातील’तेरी नजर झुके तो शाम ढले’ या गाण्यावर तरुणाने पिवळा शर्ट आणि गॉगल घालून अभिनय केला. त्याचबरोबर ज्या तरुणांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यांनी काजोल सुध्दा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कंन्फूज होईल असं म्हटलं आहे.
kailashchouhan296 या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अनेक लोकांनी लाईक केले आहे. चार मिलीयन लोकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट सुध्दा केल्या आहेत. अनेकांनी काजोल सुध्दा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फसेल असं म्हटलं आहे.