नवी दिल्लीः जगातील काही काही गोष्टी अचानक समोर येतात आणि सोशल मीडियामुळे त्या प्रचंड व्हायरल होतात. नंतर त्याच गोष्टी सोशल मीडियाच्या ट्रेंडिगमध्ये येतात. कधी कोणाचे कोणतातरी गुणला ट्रेंडिग येतो तर कधी काही काही लोकांच्या अजब वाटणाऱ्या गोष्टीही सोशल मीडियामुळे लोकांसमोर येतात. उत्तर प्रदेशमध्ये असाच एक प्रकार सोशल मीडियामुळे समोर आला आणि तिच गोष्ट सोशल मीडियावरही ती प्रचंड व्हायरल झाली.
ती व्हायरल होण्यापाठीमागे ते बनवणाऱ्या कारागिरांचेही डोकंही सुपर चालले आहे. उत्तर प्रदेशमधील कारागिरांनी एक असं टॉयलेट बनवले आहे ते बघून अनेकांना धक्का बसला आहे. त्या टॉयलेटचा फोटो बघून सोशल मीडियावर अनेकांना हसू आवरता आले नाही.
भारतात स्वच्छता गृहांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकाकरकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत. स्वच्छतागृहे बांधली जावी यासाठी गरजू कुटुंबीयांना सरकारकडून त्यासाठी आर्थिक सहाय्यही केले जाते. मात्र उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील गौरा ढुंढामध्ये बांधकाम करणाऱ्यांनी टॉयलेट असे बांधले आहे की त्याचा क्वचितच कुणातरी वापर करेल.
या बांधलेल्या टॉयलेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना हसू आवरता आले नाही. टॉयलेट बांधणाऱ्यांनी एकत्रच दोन स्वच्छता गृह बांधली आहेत. मात्र त्यामध्ये दुसरी कोणतीही भिंत बांधण्यात आली नाही.
या स्वच्छतागृहाची उभारणी केल्यानंतर काही वेळातच बसवण्यात आलेल्या टाईल्स निघाल्या आहेत. तर काही वेळातच स्वच्छतागृहासाठी असणारा दरवाजाही गायब झाला आहे.
या गोष्टी असल्या तरी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बांधकामाला आलेला खर्च बघून तर अनेकांना झटकाच बसला आहे. हे टॉयलेट बनवण्यसाठी 10 लाख रुपये खर्च आल्याचे सांगण्यात आले त्यावेळी मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या प्रकारच सार्वजनिक स्वच्छतागृह ज्या कारागिरांनी हे बांधले आहे. त्यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन यांनी तर या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.