कन्नूर : ऐकावं ते नवलचं असं काहीतरी अनेकदा कानावर येतं. आई-वडिलांसोबत लग्नासाठी (Marriage) गेलेल्या एका तरुणीचे केस कापल्याची (girl hair cut) तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (Police Station)दाखल झाली आहे. कन्नूरमधील (Kannur) करिवल्लूर येथील रहिवासी असलेली तरुणी आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून कसून चौकशी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अनूर येथील सभागृहात शनिवारी घडली आहे. तेव्हापासून कन्नूरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
लग्न समारंभ संपल्यानंतर मुलगी आई वडिलांसोबत करिवल्लूर येथील त्यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिचे केस कापल्याचे लक्षात आले. आई-वडिलांनी आणि त्या मुलीने तात्काळ अनूर येथील सभागृहात धाव घेतली. त्यावेळी त्यांना कापलेले केस सुध्दा सापडले. तिथं मुलीच्या आई-वडिलांनी लोकांना भेटून असा प्रकार घडल्याचं सुध्दा सांगितलं.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यामुळे मुलीच्या पालकांनी जवळच्या पयन्नूर पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती सुद्धा पालकांनी पोलिसांना विनंती केली आहे.
सध्या सभागृहातील सीसीटिव्ही तपासण्याचे काम सुरु आहे. नेमका कुणी हा प्रकार केलं आहे, ते लवकरचं उजेडात येईल असं आश्वासन पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना दिलं आहे.