नवी दिल्ली : रविवारी (Sunday) या देशात चक्क महिला आणि पुरुषांनी पॅंट (No Pant) न घालता ट्रेनमधून प्रवास केल्याने सगळीकडे चर्चा सुरु आहे. लंडन या देशातील अधिक प्रवाशांनी पॅंट न घालता प्रवास केल्याचे सोशल मीडियावर (Social media)फोटो अधिक व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लोकांनी पॅंट न घातल्याचे दिसत आहे. पण बाकी इतर कपडे नेहमीप्रमाणे घातले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
रविवारी लोकांनी लंडन देशात ‘ट्राऊजर्स डे’ सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे हे त्याचं बारावं वर्षे होतं. हा कार्यक्रम लिप सोसायटीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला 2002 मध्ये न्यूयॉर्क सुरुवात झाली. त्यानंतर हा दिवस अन्य देशात सुध्दा साजरा केला जाऊ लागला.
आयोजित कार्यक्रमात इतकं काही खास नव्हतं. हा कार्यक्रम फक्त मजेसाठी तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त प्रवास करताना पॅन्ट घालायची नाही अशी अट होती. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या असल्याचे पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल फोटो आणि व्हिडीओखाली मजेशीर कमेंट करण्यात आल्या आहेत. पॅन्ट घालायला विसरला का ? अशा कमेंट केल्या आहेत.