मुंबई : सध्या आयपीएलचा सीजन सुरु आहे. त्यामुळे क्रिकेटचे चाहते तुम्हाला मोबाईल किंवा टिव्हीच्यासमोर (mobile and tv) पाहायला मिळत असतील. सध्या काही आयपीएलच्या मॅच झाल्या आहेत. रोमांचक मॅच झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून काही लोकांनी आपल्या कामाच्यावेळा सुध्दा बदलल्या आहेत. कदाचित महेंद्र सिंग धोनीचं (MS Dhoni) हे शेवटचं आयपीएल असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी चाहते अधिक व्यस्त असतात. एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केली आहे. सध्या आयपीएल (IPL match 2023) सुरु आहे, त्यामुळे ती गोष्ट लोकांच्या मनाला अधिक भेदून जाणारी आहे.
ट्विटर युजर शुभ याने माइक्रो-ब्लॉगिंग साईटवरती एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये 5 स्विगी डिलिव्हरी बॉईज एकत्र दिसत आहेत. एका छोट्याशा लिफ्टमध्ये ते स्वत:ला एकाचवेळी फिट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्यक्तीने मजेशीर पोस्ट लिहिली आहे. “इमारतीतील स्विगी लोकांची संख्या ही आयपीएल सामना किती मनोरंजक होत आहे, याचे थेट संकेत आहेत.”
No. of swiggy guys in building is directly proportional to how interesting the IPL match is pic.twitter.com/61Oy6GLuhf
— Shubh (@kadaipaneeeer) April 2, 2023
ही पोस्ट आतापर्यंत आठ लाख लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर त्यावर अधिक प्रतिक्रिया देखील येत आहेत. लोकं या पोस्टला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोकांना ही पोस्ट पाहून अधिक हसू आलं आहे. एक नेटकरी म्हणतो की, आयपीएल मॅच सुरु असताना प्रत्येक सोसायटीत अशा पद्धतीचं दृष्य पाहायला मिळत आहे. काही लोकांनी डिलीव्हरी बॉयला चांगला संदेश दिला असल्याचं म्हटलं आहे. आणखी काही लोकांनी लिहिलं आहे की, आयपीएल एक मनोरंजन आहे. याचा आनंद आपण एकाचवेळी घेऊ शकतो.