निसर्गा(Nature)पेक्षा मोठा कलाकार नाही. कारण निसर्ग अशा काही गोष्टी निर्माण करतो, ज्या बघून माणसांनाही आश्चर्य व्हायला होतं, की हे नेमकं घडतं तरी कसं? हवा (Wind) कधी उष्ण, कधी थंड असते. मात्र, तिचा वेग वाढला, की ती जीवघेणीही ठरते. मात्र, वाऱ्यांच्या अप्रतिम कामगिरीची छायाचित्रं सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत आहेत, ती पाहून काहींना बुद्धीबळातली प्यादी वाटावीत. अमेरिकेतले हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच बुद्धीबळ आणि त्यातल्या प्याद्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
अमेरिकेतली घटना
ही घटना अमेरिकेतल्या मिशिगन लेकजवळ घडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तलावाच्या काठावर ‘अजब आकृत्या’ तयार झाल्या होत्या. फोटोग्राफर Joshua Nowickiनं हे अप्रतिम दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर झाल्यानंतर हे सर्व व्हायरल झालंय. लोकांना प्रश्न पडला होता, की हवेतून या आकृत्या कशा तयार झाल्या?
ट्विटरवर शेअर
हे फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. @Nature_Is_Lit या ट्विटर हँडलनं मंगळवार, 11 जानेवारी रोजी हे चित्र शेअर करत लिहिलंय, की जोरदार वाऱ्यानं मिशिगन सरोवराच्या किनाऱ्यावर गोठलेल्या वाळूमध्ये ‘अजब आकार’ तयार झालेत.’ या फोटोंना यूझर्स लाइक करून कमेंट्सही करत आहेत.
? Strong winds create unusual shapes in the frozen sand alongside Lake Michigan https://t.co/Q8KCFYQtLd pic.twitter.com/s5nkDV2Zew
— Nature is Lit (@Nature_Is_Lit) January 10, 2022
कशा तयार होतात आकृत्या?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा जोरदार वाऱ्यानं तलावाच्या काठावरची गोठलेली वाळू घर्षण पावते, तेव्हा हे विचित्र आकार तयार होतात. ही प्रक्रिया नद्या ज्या प्रकारे जमिनीवरून वाहत असताना खोरे बनवतात तशीच आहे. वाळूच्या बाबतीत ही प्रक्रिया जलद आहे. कारण वाऱ्याचा वेग जितका जास्त असेल तितके आकार मोठे होतात. ही रचना काही दिवस टिकून राहते आणि नंतर पडते.